हिमाचल प्रदेशामध्ये भूस्खलनामुळे नदीतच तयार झाले प्रचंड कृत्रीम तळे, शेती- गावांना निर्माण झाला धोका


विशेष प्रतिनिधी

सिमला – हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनामुळे चंद्रभागा नदीचा प्रवाह अवरुद्ध झाल्याने तेरा खेड्यांतील दोन हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. भूस्खलनानंतर या नदीच्या प्रवाहात मोठा अडथळा तयार होऊन तेथे एक कृत्रिम तळे तयार झाले आहे.Artificial lake creates in river due to landslide in Himachal Pradesh

या तळ्याचा परिसरातील शेती आणि गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. या घटनेनंतर नदीचा प्रवाह हळूहळू पूर्ववत केला जाऊ लागला आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. स्थानिकांनी नदीच्या काठावर किंवा भूस्खलन होण्याचा धोका असलेल्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.या घटनेचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून त्यात माती आणि दगडांचा एक मोठा ढिगारा नदीच्या पात्रात कोसळत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मागील महिन्यात देखील ढगफुटीनंतर या भागात भूस्खलन झाल्याने विविध ठिकाणांवर १७५ पर्यटक अडकून पडले होते.दुसरीकडे किन्नौर जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात मरण पावलेल्यांची संख्या पंधरावर पोचली आहे.

Artificial lake creates in river due to landslide in Himachal Pradesh

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*