Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १४ वर्षांची शिक्षा

Imran Khan

पत्नी बुशरा बीबी यांना सात वर्षांची शिक्षा; कोणत्या प्रकरणात झाली शिक्षा ते जाणून घ्या


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद:Imran Khan  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचार प्रकरणात १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्थानिक एआरवाय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या एका न्यायालयाने शुक्रवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जमीन भ्रष्टाचाराशी संबंधित एका प्रकरणात १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.Imran Khan



पाकिस्तानच्या खलीज टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रावळपिंडी येथील गैरिसन शहरातील एका तुरुंगातील भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाने हा निकाल दिला. इम्रान खान ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात आहेत. त्यांच्यावर अनेक प्रकरणांमध्ये खटला सुरू आहे.

अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निकाल ऐकण्यासाठी त्या आदियाला तुरुंगात उपस्थित होत्या.

Former Pakistan Prime Minister Imran Khan sentenced to 14 years in prison

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात