वृत्तसंस्था
सेऊल : South Korea दक्षिण कोरियात गेल्या दीड महिन्यापासून राजकीय संकट सुरू आहे. बुधवारी महाभियोगाला तोंड देणारे पायउतार राष्ट्रपती यून सुक योल यांच्यावर राजद्रोहाचा ठपका ठेवून अटक करण्यात आली आहे. अल्पकालीन लष्करी राजवट लागू केल्यानंतर अटक झालेले ते देशाचे पहिले राष्ट्रपती ठरले. भ्रष्टाचार तपास कार्यालय, राष्ट्रीय तपास यंत्रणा, व संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त टीमने त्यांच्यावर ही कारवाई केली.South Korea
योल यांच्या अटकेनंतर देशात हिंसाचार उसळण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यांच्या अटकेविरुद्ध योल यांचे हजारो समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. योल यांची सुटका करावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यावरून समर्थक व प्रशासन यांच्यात संघर्ष होण्याची भीती आहे. हिंसाचाराच्या भीतीमुळेच योल यांना व्हिडिओ संदेश जाहीर करावा लागला. अटकेनंतर या संदेशात ते म्हणाले, रक्तपात रोखण्यासाठी अटक करून घेतली आहे.
अटकेनंतर देशात दुफळी; कोरिया संकटातून बाहेर पडणे अशक्य
दक्षिण कोरिया तूर्त तरी या राजकीय संकटातून बाहेर पडेल असे वाटत नाही. योल यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या गर्दीने देशात निर्माण झालेल्या दुफळीची झलक दाखवली. एकीकडे विरोधात एकत्र आलेले लोक जल्लोष साजरा करत आहेत. दुसरीकडे चित्र अगदी उलट आहे. देशात कायद्याचे पालन केले जात नाही. अटक बेकायदा आहे, असे राष्ट्रपतींच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
आता पुढे काय ?.. ४८ तास चालणार चौकशी, २० दिवसांचे आणखी एक वॉरंट
योल यांची ४८ तास चौकशी चालेल. चौकशीनंतर योल यांना जियोंग प्रांतात सोल तपासणी केंद्रात निगराणीखाली ठेवले जाऊ शकते. त्यानंतर तपास संस्था योल यांच्या चौकशीसाठी कोर्टाकडे २० दिवसांच्या आणखी एका वाॅरंटची मागणी करतील. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर योल जामिनासाठी अर्ज करू शकतात.
३ डिसेंबरला लष्करी राजवट लागू, हाच राष्ट्रपतींच्या गळ्याचा फास ठरला
राष्ट्रपती योल यांनी गेल्या वर्षी ३ डिसेंबरला लष्करी राजवट लागू केल्याचे घोषित केले होते. त्यानंतर देशात गदारोळ झाला. परंतु विरोधानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर विरोधी पक्षाने योल यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मांडला. १४ डिसेंबरला योल यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव संसदेत मंजूर झाला होता. परंतु त्यांना राष्ट्रपतिपदावरून हटवण्याचे घटनात्मक अधिकार न्यायालयाकडे आहेत.
आठवड्यापासून तपास अधिकारी योल यांचे सुरक्षा रक्षक यांच्यात बाचाबाची होत होती. काटेरी तारा कापून अधिकारी योल यांच्या घरात घुसले. योल यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी एक हजार पोलिस जमले होते. चौकशीसाठी काढलेल्या अनेक समन्सकडे दुर्लक्ष केल्यानंतर योल यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले होते. ही कारवाई तीन तास चालली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App