100 ग्रॅम हेरॉइनही जप्त, पोलिसांनी अटक केली
विशेष प्रतिनिधी
फिरोजपूर: Punjab पंजाबच्या फिरोजपूर ग्रामीणमधील माजी आमदार सतकर कौर आणि त्यांचा पुतण्या (चालक) यांना पंजाब पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सने (STF) अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अटक केली आहे. त्यांच्याकडून 100 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे.Punjab
मोहालीतील अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (एएनटीएफ) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर माजी आमदाराच्या घरावरही छापा टाकण्यात आला. यावेळी घरातून 28 ग्रॅम ड्रग 1.56 लाख रुपये जप्त करण्यात आले. सतकर कौर यांनी 2022 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
पोलिसांच्या पथकांनी बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनर, वेर्ना आणि शेवरलेट ही चार आलिशान वाहनेही जप्त केली आहेत जी अमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापरली जात होती. पोलीस पथकाने आरोपी सतकर कौर हिला 100 ग्रॅम हेरॉईनची तस्करी करताना रंगेहात पकडले आहे. आयजीपी सुखचैन सिंग गिल यांनी ही माहिती दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App