विशेष प्रतिनिधी
मुंबई : MVA महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकूण 65 उमेदवारांचे नाव जाहिर करण्यात आले आहेत. दहिसर विधानसभा जागेबाबत माजी आमदार विनोद घोसाळकर आणि सून तेजस्विनी अभिषेक घोसाळकर यांच्यात वाद.उद्धव ठाकरेंनी दहिसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी रोखली आहे.MVA
महाविकास आघाडीच्या 85-85-85 जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित 18 जागांवर चर्चा करणार आहोत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.MVA
आनंद दिघेंच्या पुतण्याची मुख्यमंत्र्यांशी लढत
कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी होणार आहे.MVA
दरम्यान, समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र महायुतीमध्ये ही जागा शिंदे सेनेला सुटल्यामुळे अजित पवार गटाकडून तिकीट भेटणार नव्हते. त्यामुळे समीर हे ठाकरे गटात प्रवेश करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. परंतु, आता ठाकरे गटाकडून नांदगावसाठी गणेश धात्रक यांना एबी फॉर्म दिल्यानंतर त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे समीर भुजबळ यांच्या ठाकरे गटाकडून उमेदवारीच्या आशा मावळल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 38 उमेदवारांची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी आपल्या 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. अजित पवार हेच बारामती विधानसभा मतदारसंघातून एनसीपीचे उमेदवार असतील, अशी घोषणा तटकरे यांनी केली. याबरोबरच येवल्यातून छगन भुजबळ तर परळीतून धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने आपल्या पहिल्याच यादीत आपल्या सर्व 9 मंत्र्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मंत्र्यांत अजित पवारांसह, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, आदिती तटकरे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे व धर्मरावबाबा आत्राम यांचा समावेश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App