MVA : महाविकास आघाडीचा 85 चा फॉर्म्युला; “आइनस्टाईन”ने बेरजेचा घोळ घातला, नंतर तर सगळ्याच आकडेमोडीचा चुथडा!!


नाशिक : MVA महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बरीच भवती न भवती करून 85 चा फॉर्म्युला काढला, पण आघाडीमध्ये सगळेच “गणिताचे बाप” असल्याने “आईन्स्टाईन”च्या थाटात काढलेला 85 च्या फॉर्म्युलात बेरजेचा घोळ झाला, नंतर तर सगळ्याच आकडेमोडीचा चुथडा झाला. MVA

– याची रंगतदार कहाणी अशी :

महाविकास आघाडीतल्या तिन्ही घटक पक्षांनी एकमेकांची खेचण्यासाठी जागावाटपात प्रचंड वाद घातला. आधी नाना पटोलेंविरुद्ध सगळे, नंतर नानांविरुद्ध संजय राऊत असे झगडे रंगविले. शेवटी पवारांनी सगळ्यांची कानउघडणी करून त्यांना एकत्र बसविले आणि सगळ्या “आईन्स्टाईन”नी मिळून 85 चा फॉर्म्युला काढला. त्यानंतर मोठ्ठी पत्रकार परिषद घेऊन नानांनी तो 85 चा फॉर्म्युला जाहीर करून त्याची बेरीज 270 भरल्याचे सांगितले.

… आणि इथेच सगळा घोळ झाला. कारण 85 च्या फॉर्मुल्याची बेरीज फक्त 255 भरली. त्यामुळे नाना आणि महाविकास आघाडीतल्या “आइनस्टाईनचे” बेरीज चुकल्याचे उघड झाले. मराठी माध्यमांनी चुकलेल्या गणिताच्या बातम्या केल्या. महायुतीतल्या पक्षांनी महाविकास आघाडीच्या “आइनस्टाईन”ची अब्रू काढली. पण त्याचवेळी उरलेल्या 33 जागांवर फारच वाद असल्याचे उघड झाले. या 33 जागा छोट्या मित्र पक्षांच्या गळ्यात घालण्याचा महाविकास आघाडीचा “डाव” उघड झाला.MVA

– पत्रकार परिषदेनंतर देखील बैठक

पण हा घोळ इथपर्यंतच थांबला नाही. पत्रकार परिषदेनंतर देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये जास्तच खेचाखेच झाली. काँग्रेस 100 पेक्षा कमी जागा लढवायला तयार नाही, त्या 105 तरी पाहिजेत म्हणून मग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 95 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 80 पर्यंत खाली ढकलायचा प्रयत्न झाला. उरलेल्या जागा हव्या तर मित्र पक्षांच्या गळ्यात घाला, असे काँग्रेसच्या नेत्यांनी परस्पर सांगून टाकले. त्यापलीकडे जाऊन विजय वडेट्टीवार यांनी तर काँग्रेसच्या 95 % जागा आम्ही जाहीर करून टाकू, अशी दमबाजी करून ठाकरे आणि पवारांच्या नेत्यांची हवा काढली.

या सगळ्या घडामोडींमधून महाविकास आघाडीत गणिताचे एक – एक कसे “आईन्स्टाईन” भरले आहेत, हेच उघड्यावर आले. कारण त्यांनी 288 जागांमध्ये जो 85 चा फॉर्म्युला काढला, त्याची सुरुवातीला बेरीज चुकवली आणि नंतर सगळेजण डबल डिजिट वर आलेले पाहून काँग्रेस नेते भडकले आणि त्यांनी पुन्हा खेचायला सुरुवात केली. या सगळ्यामध्ये गणिताचा पुरता चुथडा झाला. आता त्यांच्या गणिताचे अंतिम उत्तर 0 येऊ नये म्हणजे मिळवलीन्…!!

(व्यंगचित्र : सुमंत बिवलकर)

MVA leaders 85 formula failed, major mistake in calculations

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात