वृत्तसंस्था
मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक अंशुमन गायकवाड( Anshuman Gaikwad )यांचे बुधवारी रात्री वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून ब्लड कॅन्सरशी झुंज देत होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गायकवाड यांच्या उपचारासाठी एक कोटी रुपयांची मदतही केली होती.
याशिवाय 1983च्या विश्वचषक विजेत्या संघातील सदस्यांनीही गायकवाड यांना मदत केली. जून 2024 मध्ये लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये ब्लड कॅन्सरवर उपचारही केले. यानंतर ते भारतात परतले. बुधवारी त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले – गायकवाड हे प्रतिभावान खेळाडू होते.
मोदी म्हणाले- गायकवाड नेहमी स्मरणात राहतील
गायकवाड यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे. शोक व्यक्त करताना ते म्हणाले- अंशुमन गायकवाड यांचे क्रिकेटमधील योगदान स्मरणात राहील. ते एक प्रतिभावान खेळाडू आणि उत्कृष्ट प्रशिक्षक होते. त्यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांप्रति संवेदना.
त्याचवेळी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही X वर पोस्ट करून शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले- अंशुमन गायकवाड यांच्या कुटुंबीय आणि मित्रांप्रति माझ्या संवेदना. संपूर्ण क्रिकेट जगतासाठी ही दुःखद घटना आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
गायकवाड यांना सुनील गावस्कर यांचा उजवा हात म्हणत
अंशुमन गायकवाड दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्यासह सलामीवीर होते. त्यांना सुनील गावस्कर यांचा उजवा हात म्हटले जायचे. गायकवाड हे बचावात्मक तंत्राचे फलंदाज होते. त्यांना ‘द ग्रेट वॉल’ असेही म्हणत.
गायकवाड यांनी 1983-84 मध्ये जालंधर कसोटी सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 201 धावा करण्यासाठी 671 मिनिटे फलंदाजी केली. त्यावेळी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे सर्वात संथ द्विशतक होते.
1976 मध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात मायकल होल्डिंगचा एक चेंडू गायकवाड यांच्या कानाला लागला. त्यांना दवाखान्यात जावे लागले.
जून 2018 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. अंशुमान गायकवाड यांचे वडील दत्ता गायकवाड हे देखील क्रिकेटपटू राहिले आहेत. त्यांनी 11 कसोटी सामने खेळले आहेत. 1959 मध्ये ते संघाचे कर्णधारही होते.
गायकवाड 1997 ते 1999 या काळात क्रिकेटचे मुख्य प्रशिक्षक होते
गायकवाड यांच्या क्रिकेट कारकिर्दीत 22 वर्षांच्या 205 प्रथम श्रेणी सामन्यांचा समावेश आहे. गायकवाड हे 1997-99 भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक देखील होते. त्याच्या प्रशिक्षणाखाली संघाने 2000 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उपविजेतेपद पटकावले. अनिल कुंबळेने 1999 च्या फिरोजशाह कोटला येथे झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानविरुद्ध एका डावात सर्व 10 विकेट घेतल्या होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App