गोव्यात ममतांनी पक्ष फोडूनही काँग्रेसची उमेदवार यादी जाहीर करण्यात आघाडी!!


वृत्तसंस्था

पणजी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोव्यात येऊन काँग्रेस पक्ष फोडून आपली तृणमूल काँग्रेस बळकट करण्याचा चंग बांधला असला, तरी काँग्रेस पक्षाने मात्र अजिबात हार मानलेली दिसत नाही. उलट काँग्रेसने तृणमूल काँग्रेस तसेच भाजप यांच्यावर आघाडी घेतली असून पहिली उमेदवार यादीत केला जाहीर केली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना परंपरागत मडगाव विधानसभा मतदार संघातून तिकीट जाहीर केले आहे.Former CM Digambar Kamat to contest from Margao Assembly seat

कामत त्यांच्या खेरीज अन्य सात जणांना पक्षाने उमेदवारी दिली असून हे सगळे उमेदवार पक्षाचे निष्ठावंत आहेत, असे पक्ष प्रवक्त्यांनी सांगितले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या स्वाक्षरीने ही यादी काँग्रेसने जाहीर केली आहे.

गोव्यात भाजपची सत्ता आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दोन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर होते. या काळात ममता बॅनर्जी गोव्यात तळ ठोकून होत्या. त्यांनी तोंडी तोफा जरी भाजपवर डागल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्यांनी काँग्रेस पक्ष फोडला आहे. माजी मुख्यमंत्री लुइजिनो फालेरो यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस निवडणूक लढवत आहे.

पण ममता बॅनर्जी यांनी फक्त काँग्रेसच फोडली असे नसून राष्ट्रवादी काँग्रेसही फोडली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राजकीय कृतीतून आपला आक्रमकपणा सिद्ध केला आहे. भाजप आणि तृणमूळ काँग्रेस यांच्यावर राजकीय मात करत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष सोनिया गांधी अधिक ऍक्टिव्हेट झाल्यानंतर गोव्यात देखील पक्षांमध्ये या पद्धतीने चैतन्य आल्याचे दिसत आहे. म्हणूनच पक्षाने काँग्रेसने इतर पक्षांच्या आधी आठ जणांची आपली उमेदवारी यादी जाहीर केली आहे.

Former CM Digambar Kamat to contest from Margao Assembly seat

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात