देशात तिसऱ्या टप्यातील लसीकरणाची तयारी सुरू असताना सुरू झालेल्या राजकारणावर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी विरोधकांना फटकारले आहे. कोरोना महामारीची त्सुनामी आली असताना किमान काही आदर्श आपण पाळणार आहोत की नाही असा सवालही त्यांनी केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात तिसऱ्या टप्यातील लसीकरणाची तयारी सुरू असताना सुरू झालेल्या राजकारणावर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी विरोधकांना फटकारले आहे. कोरोना महामारीची त्सुनामी आली असताना किमान काही आदर्श आपण पाळणार आहोत की नाही असा सवालही त्यांनी केला आहे. Follow at least a few ideals, starting with the politics of vaccination. Harsh Vardhan hit,
देशात एक मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. यामध्ये अठरा वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार आहे. मात्र, यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांनी आपल्या लसींचे दर जाहीर केले आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी रुग्णालये यांच्यासाठी वेगवेगळे दर आहेत.
लस उत्पादक कंपन्यांना आपल्या उत्पादनातील पन्नास टक्के लसी केंद्र सरकारला पुरविणे बंधनकारक आहे. केंद्राकडून या लसीचे मोफत वितरण केले जाणार आहे. उर्वरित पन्नास टक्के राज्य सरकार आणि बाजारात मिळणार आहेत. मात्र, यामुळे विरोधकांनी लसीबाबत अपप्रचार सुरू केला आहे.
डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, कोरोना विषाणू त्सुनामीसारखा पसरत आहे. त्यामुळे या गंभीर संकटाच्या काळात लसीकरणाबाबतचे निर्बंध कमी करून राज्य सरकार आणि खासगी क्षेत्राला यामध्ये सहभागी करून घेणे आवश्यक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लसीकरणासाठीचे धोरण बदलण्याचा निर्णय घेतला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App