बिहारमध्ये महाबोधी मंदिर परिसरात गोळीबार, एका पोलिसाचा मृत्यू


घटनेनंतर महाबोधी मंदिराभोवती नाकाबंदी करून सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

विशेष प्रतिनिधी

पाटणा :  बोधगयाच्या महाबोधी मंदिर परिसरात आज गोळीबाराची घटना घडली, यामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. सध्या महाबोधी मंदिराभोवती नाकाबंदी करून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महाबोधी मंदिर परिसरात गोळी लागल्याने मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव अमरजीत  यादव (वय-४५) असून तो विसाप येथील रहिवासी आहे. सत्येंद्र यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. Firing near Mahabodhi temple in Bihar one policeman killed

मात्र गोळीबार नेमका कोणी केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.  घटनेनंतर महाबोधी मंदिराभोवती नाकाबंदी करून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सामान्य पर्यटक आणि पत्रकारांनाही मंदिरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.  गयाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आशिष भारती यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले आहे की, महाबोधी मंदिराच्या आवारात गोळीबाराचा आवाज ऐकू आला, त्यानंतर तेथे तैनात असलेल्या सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना सतर्क करण्यात आले. महाबोधी मंदिर परिसरात तपास केला असता एक जवान रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.

त्यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीमध्ये मृत जवानाचे नाव सत्येंद्र यादव असे समोर आले होते, मात्र त्याचे नाव अमरजीत यादव असे  आहे. महाबोधी मंदिरात झालेल्या गोळीबारामागील कारण मात्र पोलीस अधीक्षक आशिष भारती यांनी स्पष्ट केले नाही. पाटणा येथून एफएसएल टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. स्थानिक पोलीसही त्यांच्या स्तरावरून तपास करत आहेत.

Firing near Mahabodhi temple in Bihar one policeman killed

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!