अडकलेल्या नागरिकांना खिडक्यांमधून बाहेर काढण्यात आले
वृत्तसंस्था
हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील नामपल्ली भागात असलेल्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या गॅरेजमध्ये सोमवारी लागलेल्या आगीत चार दिवसांच्या बाळासह किमान ९ जणांचा मृत्यू झाला.Fire breaks out in multi storied building in Hyderabad 9 people including a four-day-old baby died
सेंट्रल झोनचे डीसीपी व्यंकटेश्वर राव यांनी सांगितले की, ज्या अपार्टमेंटमध्ये आग लागली ते बाजारघाट, नामपल्ली येथे आहे. कार गॅरेजच्या तळमजल्यावर लागलेली आग वरच्या मजल्यापर्यंत पसरली आणि लोक अडकले. यानंतर लोकांना खिडक्यांमधून बाहेर काढण्यात आले.
सोमवारी सकाळी ९.३५ च्या सुमारास नामपल्ली येथील बाजार घाट परिसरात सहा मजली इमारतीत ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली, तर सध्या बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. या अपघातात जखमी झालेल्या तीन जणांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App