प्रतिनिधी
नवी मुंबई : दिवाळीचे औचित्त्य साधत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा बोनस एनएमएमटीने दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असलेल्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी (NMMT) बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा उद्यापासून म्हणजे रविवार, १३ नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे. senior citizen Free bus travel in Navi Mumbai
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी तर्फे भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना १७ मार्च २०२३पासून एसटीमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली आहेच
तसेच लोकप्रतिनिधी आणि ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या मागणीमुळे पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिवाळी सणाचे औचित्य साधत १३ नोव्हेंबर २०२३ पासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या एनएमटी बसचा प्रवास मोफत असेल, असे जाहीर केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more