Mission Mahagram : ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन आणि IDBI बँक यांच्यात सामंजस्य करार!

Mission Mahagram MoU between Village Social Transformation Foundation and IDBI Bank

राज्यातील 104 गावांमध्ये आगामी 3 वर्षांसाठी ‘मिशन महाग्राम’ कार्यक्रम राबवला जाणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मिशन महाग्राम अंतर्गत ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन आणि आयडीबीआय बँक यांच्यातील सामंजस्य करार व धनादेश हस्तांतरण कार्यक्रम काल संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, आमदार रत्नाकर गुट्टे, अधिकारी उपस्थित होते. Mission Mahagram MoU between Village Social Transformation Foundation and IDBI Bank

महाराष्ट्र राज्याचा ग्रामीण भागातील विकासासाठी ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान- 2: ‘मिशन महाग्राम’ची सुरुवात करण्यात आली. या अभियानासाठी आयडीबीआय बँकेसोबत संयुक्त भागिदारी विकसित करुन राज्यातील 104 गावांमध्ये आगामी 3 वर्षांसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.


मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी ठाकरे – पवारच!!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात


यासाठी बँकेने 11 कोटी 62 लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावामंध्ये कृषी व कृषी संलग्न क्षेत्र, ग्रामीण गृह निर्माण क्षेत्र, ग्रामीण आरोग्य क्षेत्र, पाणी पुरवठा, स्वच्छता, जलसंधारण क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, उपजीविका क्षेत्र आणि विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.

या प्रकल्पात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर व कन्नड तालुके, जळगाव मधील जामनेर, पुणे जिल्ह्यातील बारामती व दौंड, सोलापूर मधील अक्कलकोट व पंढरपूर, आणि नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यांचा समावेश आहे. राज्यातील जनतेच्या विकासासाठी हे अभियान राबविण्यात येत असून निश्चितच या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनमानात सकारात्मक बदल होईल, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Mission Mahagram MoU between Village Social Transformation Foundation and IDBI Bank

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात