सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली.
विशेष प्रतिनिधी
तामिळनाडू : अरियालूर जिल्ह्यात सोमवारी एका फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी एका निवेदनात या अपघातातील मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांच्या कुटुंबीयांना रोख मदत जाहीर केली. fire breaks out at firecrackers factory in Tamil Nadu 10 killed 13 injured
ही घटना जिल्ह्यातील विरागलूर गावातील एका खासगी फटाका निर्मिती कारखान्यात घडली. कारखान्याला आग कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे. मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी सांगितले की, पाच जखमींना तंजावर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना विशेष वैद्यकीय सेवा देण्यात आली आहे.
याशिवाय त्यांनी त्यांचे कॅबिनेट सहकारी एसएस शिवशंकर आणि सीव्ही गणेशन यांना बचाव आणि मदत कार्ये जलद करण्यासाठी तैनात केले आहेत. त्यांनी प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख रुपये, गंभीर जखमींना 1 लाख रुपये आणि मध्यम जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App