विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मागील सात महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने सरकारवर दबाव वाढविण्यासाठी २६ जूनला देशभरातील सर्व राजभवनावर निदर्शने करण्याची घोषणा केली आहे.Farmers will demonstrates on all over country
शेतकरी नेते इंद्रजितसिंग यांनी ही घोषणा करताना २६ जूनला या निदर्शनांसोबतच शेती वाचवा, लोकशाही वाचवा हा दिवसी पाळला जाईल, असे सांगितले. याच दिवशी (२६ जून) १९७५ मध्ये आणीबाणी लागू झाली होती
आणि शेतकरी आंदोलन देखील याच दिवशी सात महिने पूर्ण करत आहे. या दडपशाहीच्या वातावरणात शेतीसोबतच लोकशाहीवरही हल्ला झाला असून ही अघोषित आणीबाणी आहे, असे टीकास्त्र इंद्रजितसिंग यांनी सोडले.
आंदोलनाची आक्रमकता वाढविण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने मागील महिन्यात मोदी सरकारच्या सत्तास्थापना दिनी २६ मेस काळा दिवस पाळला होता. आता आंदोलनाला सात महिने पूर्ण होत असल्याबद्दल २६ जूनला देशभरातील राजभवनावर निदर्शने करून आपली ताकद दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App