सहा महिन्यांनंतरही किसान मोर्चा आक्रमक, उत्तर प्रदेशात भाजपविरोधी प्रचार करण्याचा इशारा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले. हे आंदोलन भविष्यामध्येही सुरूच ठेवण्याची घोषणा करत संयुक्त किसान मोर्चाने केंद्राने आम्हाला कमी लेखू नये असा स्पष्ट इशारा दिला आहे. Kisan morcha is still adamant

शेतकरी यापुढेही अहिंसात्मक मार्गाने कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरूच ठेवतील, असा इशारा देतानाच सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याची किंवा त्याला तुच्छ लेखण्याची चूक करू नये, असेही किसान मोर्चाने म्हटले आहे. शेतकरी आंदोलकांना पुन्हा चर्चेसाठी बोलवा, असे आवाहनही किसान मोर्चाने केले आहे.



नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल आणि केरळच्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच उत्तरप्रदेशातील आगामी निवडणुकीतही शेतकरी मोदी सरकारच्या विरोधात प्रचार करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. दिल्लीच्या टिकरी, सिंघू आणि गाझीपूर या तिन्ही सीमांवर आज हजारो शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकावले. आजच्या आंदोलनामध्ये महिला शेतकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या

राकेश टिकैत म्हणाले, शेतकरी आपले अहिंसात्मक आंदोलन या पुढेही चालू ठेवतील आणि त्यासाठी कितीही काळ दिल्लीच्या सीमांवर थांबण्याची आमची तयारी आहे. दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनाला प्रतिसाद थंडावल्याचे वृत्त धादांत खोटे आहे. लवकरच आंदोलनस्थळी पुन्हा हजारो शेतकरी दाखल होतील.

Kisan morcha is still adamant

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात