VIDEO : तसंही कुणीतरी म्हटलेलंच आहे, “ हर गांधी महात्मा नही होता” तेच खरं – भाजपाने लगावला टोला!

BJP Rahul Gandhi New

”काँग्रेसच्या राहुल गांधीने आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा खरा जातीयवादी चेहरा आज समस्त भारताला दाखवून दिला.”, असंही भाजपाने म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  काँग्रेसचे केरळच्या वायनाडमधील खासदार राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ बद्दल अपमानास्पद टिपण्णी केल्यानंतर त्यांना दोषी ठरवून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. तसेच,  राहुल गांधींना गुजरातच्या सुरत कोर्टात मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर कायद्यानुसार त्यांचे संसदेचे सदस्यत्व संपुष्टात आले आहे.  याप्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांचे नेते, कार्यकर्ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका केली जात आहे. यावर महाराष्ट्र भाजपाने एका व्हिडीओद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘’काँग्रेसच्या राहुल गांधीने आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा खरा जातीयवादी चेहरा आज समस्त भारताला दाखवून दिला. तसेही कुणीतरी म्हटलेच आहे, ‘हर गांधी महात्मा नही होता’ तेच खरं.’’ असं महाराष्ट्र भाजपाने म्हटलं आहे. Even  someone has said Every Gandhi is not a Mahatma That is true BJP


राहुल गांधींनी ट्विटरचा बायो अपडेट करत स्वतःला ‘अपात्र खासदार’ संबोधले; पाहा नेमकं काय लिहिलं आहे?


महाराष्ट्र भाजपाने ट्वीटरवर जारी केलेल्य व्हिडिओत म्हटले आहे की, ‘’पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय राजकरणातल्या अध्यायतलं एक सुवर्ण पान आहे. ज्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आणि समर्थकांचा कित्येक वर्षांचा राजकीय लढा यशस्वी तर केलाच, पण जी ध्येय घेऊन भाजप उभा राहिला, त्या उभारीला सत्तेच्या केंद्रस्थानी आणून नवी भरारी दिली. इतकी दशकं जाहीरनाम्यात जे सांगितलं गेलं, ते क्रमाक्रमाने पूर्ण केलं. राम मंदिर असो की काश्मीरमधून कलम ३७० हटवणं मोदी प्रत्येक आव्हानांना पुरून उरले. मोदींबदद्ल दोन ओळीत सांगायचं जर झालं, तर मोदी राष्ट्रीय राजकारणात आले, ते लढले भाजप बहुमाते विजयी झाला. भाजपला जिंकण्याची सवयच लागली. पण हे सर्व सोपं नक्कीच नव्हतं. पक्षाला इथपर्यंत पोहचवण्यासाठी मोठा खडतर प्रवास त्यांना करावा लागला. ज्या प्रवासाची सुरुवात वैयक्तिक आयुष्यापासून सुरू होऊन, पक्षाच्या सर्वोच्च स्थानाचं नेतृत्व करण्यापर्यंत आहे.’’

काश्मीरमध्ये धाडसाने लाल चौकात तिरंगा सुद्धा फडकावला –

याचबरोबर ‘’१९५० साली मोदींचा जन्म वडनगर येथील सर्वसामान्य घरात झाला. ते स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत. लहानपणीच घरच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्याने, वडिलांना मदत म्हणून त्यांनी चहा विकला. कुणाला माहीत होतं की हा चहावाला मोठा होऊन, काँग्रेसला पाणी पाजेल. भाजपाला न भूतो न भविष्यती असं अभूतपूर्व यश मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारक म्हणून राबणाऱ्या कार्यकर्त्याने, इंदिरा गांधींची आणीबाणी सुद्धा झेलली. राम मंदिर रथयात्रेतही सहभाग नोंदवला आणि काश्मीरमध्ये धाडसाने लाल चौकात तिरंगा सुद्धा फडकावला. तेव्हा कुठे जाऊन मोदी गुजरातच्या सक्रीय राजकारणात केंद्रस्थानी आले.’’ असंही सांगण्यात आलं आहे.

https://youtu.be/vgPcvCkr-Dg

अपमानजनक टीकेला उत्तर न देता, राष्ट्रहीत सर्वपरी मानत जनकल्याणकारी योजना राबविल्या –

याशिवाय ‘’तेथील राजकीय प्रवासाची सुरुवात सुद्धा अत्यंत बिकट वाटेने झाली. सुरुवातीलाच काँग्रेसने गंभीर आणि खोटे आरोप करून, त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस इतक्या खालच्या पातळीवर गेलं, की त्यांनी मोदींना हिनवण्यासाठी मौत का सौदागर, चाय वाला, अमेरिकेचा व्हिसा नाकारलेला, शंभर तोंडाचा रावण, चौकीदार चोर है, हिटलर, नीच अशी अत्यंत हीन विशेषणं वेळोवेळी वापरली. पण संघात घडलेल्या मोदींनी या सर्व अपमानजनक टीकेला उत्तर न देता, राष्ट्रहीत सर्वपरी या ब्रीद वाक्यावर चालत जनकल्याणकारी योजना राबवण्याचा झपाटा लावला. यामुळे गुजरातचं मुख्यमंत्री पद भूषवून दोनदा पंतप्रधान बनण्याचा बहुमान त्यांना मिळाला.’’ असं भाजपाने म्हटलं आहे.

जनतेकडून मतांच्या रूपाने भरभरून प्रेम दिलं –

तसेच ‘’सर्व गलीच्छ टीका सपशेल अपयशी ठरल्यामुळे राहुल गांधींनी अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आडनाव वापरून सर्व मोदी चोर असल्याची जातीयवाचक गलिच्छ टीका सुरू केली. संघाने मोदींना प्रचारक बनवताना, भाजपाने त्यांना मुख्यमंत्री बनवताना, भारतीयांनी त्यांना पंतप्रधान बनवताना कधीही हा विचार केला नव्हता की ते तेली समजाचे आहेत, ते मागासवर्गीय आहेत. सर्वांनी त्यांना आपलं नेतृत्व, कुटुंबातील एक सदस्य याप्रमाणे आपलं मानून त्यांना मतांच्या रूपाने भरभरून प्रेम दिलं. मग यात प्रांतवाद गळून पडला. भाषावाद आडवा आला नाही.’’ असं भाजपाने दाखवलं आहे.

लोक नेत्याला विरोध करण्यासाठी जातीयवाचक बोलणं निर्लज्जपणाचं –

‘’पण काही लोक अपवादा‍त्मक आणि विवादास्पद असतात, त्यातीलच एक व्यक्ती म्हणजे काँग्रेसचे राजकुमार राहुल गांधी. ज्यांनी वाढदिवस सुद्धा विमानात साजरे केले, राजकारण पार्टटाईम म्हणून केलं. त्यांनी स्वत:चा धर्म सुद्धा निवडणुकीचा मूड पाहून वेगवेगळा दाखवला. त्यांनी मोदींसारख्या लोक नेत्याला विरोध करण्यासाठी जातीयवाचक बोलणं निर्लज्जपणाचं आहे. त्याहून जास्त दुर्दैवं तर राहुल गांधींना जातीयवाचक टीकेसाठी कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यावर, लोकसभा सचिवालयाने खासदारकी रद्द केल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ आंदलन करणं हे आहे. काँग्रेसच्या राहुल गांधींनी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा खरा जातीयवादी चेहरा आज समस्त भारताला दाखवून दिला. तसंही कुणीतरी म्हटलेलेंच आहे, हर गांधी महात्मा नही होता. तेच खरं.’’ असं म्हणत भाजपाने राहुल गांधींवर टीका केली आहे.

Even  someone has said Every Gandhi is not a Mahatma That is true BJP

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात