विशेष प्रतिनिधी
नाशिक : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मशाल चिन्ह असलेल्या शिवसेनेचा प्रवास जनाब बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून अली जनाब उद्धव साहेब ठाकरे यांच्या पर्यंत येऊन ठेपला आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपशी फारकत घेऊन महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री बनल्यानंतर भिवंडी, मुंब्रात जनाब बाळासाहेब ठाकरे अशी कॅलेंडर छापली गेली होती, इतकेच नाहीतर त्यांच्या शिवसेनेने मुंब्रात अजान स्पर्धा घेतली होती. Shivsena posters in urdu in malegaon; from Hindutva to so called secularism
हिंदुत्ववाद ते तथाकथित धर्मनिरपेक्ष वाद अशी शिवसेनेची ती वाटचाल होती. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला पूर्णपणे हिंदुत्ववादी पक्ष बनवल्यानंतर गर्व सें कहो हम हिंदू है!!, अशी घोषणा दिली होती. रस्त्यांवरच्या नमाजाविरुद्ध त्यांनी जहरी भाषेत टीका केली होती. दसरा मेळाव्यातली त्यांची भाषणे त्यावेळी प्रचंड गाजली होती आणि शिवसेनेचा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात दरारा निर्माण झाला होता.
पण नंतरच्या काळात बरेच राजकारण फिरले उद्धव ठाकरे यांनी भाजपपासून फारकत घेऊन आपले जुने राजकीय शत्रू असलेल्या काँग्रेस – राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जनाब बाळासाहेब ठाकरे असे नामकरण झाले. त्यानंतर आता मालेगावच्या सभेपूर्वी जी विविध पोस्टर्स लागली आहेत, त्यावर अली जनाब उद्धव साहेब ठाकरे असे नामकरण झाले आहे. “अब हमे जितने तक लढना है : अली जनाब उद्धव साहेब ठाकरे”, असे नाव या पोस्टर्सवर झळकले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ते जनाब बाळासाहेब ठाकरे आणि आता अली जनाब उद्धव साहेब ठाकरे असा शिवसेनेचा प्रवास झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more