वृत्तसंस्था
मुंबई : एखादा मराठी माणूस पात्रता असेल तर तो निश्चितच पंतप्रधान बनू शकतो, असे स्पष्ट मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असताना पंच्याहत्तर वर्षात महाराष्ट्राचा एखादा नेता, देशाचा पंतप्रधान का झाला नाही? या असा प्रश्नावर ते बोलत होते. Eligible Marathi man will definitely become the Prime Minister; Union Minister Nitin Gadkari’s opinion
नितीन गडकरी म्हणाले की, “महाराष्ट्राचा पंतप्रधान झालाच पाहिजे, असं मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती पंतप्रधान झाला पाहिजे. मग त्याची जात, धर्म, पंत आणि राज्य कोणतंही असो. त्यामुळे मराठी माणूसच झाला पाहिजे, किंवा महाराष्ट्रातीलच झाला पाहिजे, असं काही मला मान्य नाही. उद्या जर, एखादा मराठी माणूस त्या पात्रतेचा असेल, तर तो पंतप्रधान होईल. त्याला ती संधी मिळेल.
एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रासाठीचं आपलं व्हिजन मांडलं. ते म्हणाले, “सूरतपासून नाशिक, नाशिकहून अहमदनगर आणि अहमदनगरहून सोलापूर असा नवा महामार्ग तयार होणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबईचं ५० टक्के ट्रॅफिक कमी होणार आहे. तसेच मुंबई-दिल्ली एक्सप्रेस हायवेमुळेदेखील प्रदूषण कमी करु. आपण इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, सीएनजी यांचा वापर वाढवायला हवा.
पुण्यात ऑटो रिक्षा, स्कूटर या ताबडतोब इथेनॉलवर चालवाव्यात, असा माझा आग्रह आहे. पंतप्रधानांनी दोन पेट्रोल पंपांचं उद्घाटनही केलं आहे. त्यामुळे याबाबत महाराष्ट्र सरकारनं पुढाकार घेतला तर ग्रोथ रेट वाढेल.
– नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App