वृत्तसंस्था
नवी दिल्ली : न्यूजक्लिक मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी अमेरिकन व्यावसायिक नेव्हिल रॉय सिंघम यांना समन्स बजावले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिंघम चीनच्या शांघायमध्ये राहतो. त्यामुळे ईडीने परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने चिनी अधिकाऱ्यांना समन्स पाठवले जेणेकरून ते सिंघमपर्यंत पोहोचवू शकतील. ED summons industrialist Singham in Newsclick case; Accused of funding Indian websites to spread Chinese propaganda
ईडीने क्यूबन-श्रीलंकन वंशाच्या सिंघमला एक ईमेल पाठवून त्याचे जबाब नोंदवण्यासाठी भारतातील कार्यालयात येण्यास सांगितले आहे. वास्तविक, न्यूजक्लिकवर चीनी प्रचाराच्या मोबदल्यात पैसे घेतल्याचा आरोप आहे. न्यूजक्लिकवर प्रामुख्याने सिंघमकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे.
दिल्ली कोर्टाची चीनच्या न्यायालयाला औपचारिक विनंती
गेल्या वर्षीही ईडीने सिंघमला समन्स बजावले होते, मात्र त्यानंतर चिनी अधिकाऱ्यांनी समन्स स्वीकारण्यास नकार दिला होता. न्यूजक्लिक प्रकरणातील सुनावणीदरम्यान दिल्ली न्यायालयाकडून चीनच्या न्यायालयाला औपचारिक विनंती करण्यात आली होती. यानंतर ईडीने सिंघमवर ही कारवाई केली.
ईडीसह 5 एजन्सीकडून या प्रकरणाचा तपास
ईडीसह पाच एजन्सी न्यूजक्लिकच्या विरोधात तपास करत आहेत. प्रथम दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एफआयआर नोंदवला होता. त्याआधी दिल्ली पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा आणि आयकर विभाग या प्रकरणाशी संबंधित वेगवेगळ्या प्रकरणांची चौकशी करत होते. यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)ही या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App