विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने 752 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांच्या यादीत दिल्लीतील नॅशनल हेराल्ड हाऊस, लखनऊमधील नेहरू भवन आणि मुंबईतील नॅशनल हेराल्ड हाऊसचा समावेश आहे.‘ED’ big action in National Herald case, assets worth 752 crores seized
नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या तपासासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने यंग इंडियन, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी संबंधित कंपनीची 90 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
“ईडीने पीएमएलए, 2002 अंतर्गत चौकशी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात 751.9 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या तात्पुरत्या अटॅचमेंटचा आदेश जारी केला आहे,” असे ईडीने ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
ईडीच्या या कारवाईवर काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, ईडीने एजेएल मालमत्ता जप्त केल्याच्या बातम्या राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणुकांतील निश्चित पराभवावरून लक्ष वळवण्याची त्यांची हताशता दर्शवते.
केंद्रावर राजकीय सूडबुद्धीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप काँग्रेसने नेहमीच केला आहे. मनी लाँड्रिंग किंवा आर्थिक देवाणघेवाणीचा कोणताही पुरावा नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App