विशेष प्रतिनिधी
मुंबई – पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ‘एचडीआयएल’च्या २३३ कोटी रुपयांच्या प्रेफरन्स शेअर्सवर टाच आणली आहे. या शेअर्सच्या माध्यमातून ‘एचडीआयएल’ला घाटकोपर येथे ९० हजार २५० चौ. फुटांचे चटई क्षेत्र विकण्याचा हक्क प्राप्त झाला होता.ED attaches shares of HDIL
पीएमसी बँकेकडून ‘एचडीआयएल’ने फसव्या पद्धतीने कर्ज घेतले. या फसव्या कर्जामधूनच निर्माण झालेली कमाई म्हणजे एचडीआयएल ग्रुप कंपन्यांचे २३३ कोटी रुपयांचे ‘कम्पल्सरी कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स’. ठराविक वेळेत या शेअर्सद्वारे निश्चित कमाई करता येते. आता या शेअर्सवरच ‘ईडी’ने टाच आणली आहे.
रिझर्व्ह बॅंकेने नेमलेल्या प्रशासकाने आर्थिक गुन्हे शाखेकडे पीएमसी बँकेत सहा हजार ६७० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी पीएमसी बॅंकेचा तत्कालीन व्यस्थापकीय संचालक जॉय थॉमस याच्या जबाबानंतर कर्ज देण्यात
अनियमितता असल्याचे उघड झाले होते. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पुढे प्राथमिक तपासात आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे मिळाल्यामुळे ‘ईडी’नेही गुन्हा दाखल केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App