पीएमसी बॅंक घोटाळ्यात शिवसेनेचा आणखी एक माजी खासदार, कोट्यवधी रुपये हस्तांतरीत केल्याचे तपासात समोर

पंजाब महाराष्ट्र बॅंक (पीएमसी) घोटाळ्यात शिवसेनेची भूमिका आणखी उघड होऊ लागली आहे. शिवसेनेचा आणखी एक माजी खासदार या प्रकरणात अडकलेला असून त्याच्या खात्यात कित्येक कोटी रुपये हस्तांतरीत झाल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या तपासात पुढे आले आहे. Another former Shiv Sena MP in the PMC Bank scam is facing investigation into the transfer of crores of rupees


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पंजाब महाराष्ट्र बॅंक (पीएमसी) घोटाळ्यात शिवसेनेची भूमिका आणखी उघड होऊ लागली आहे. शिवसेनेचा आणखी एक माजी खासदार या प्रकरणात अडकलेला असून त्याच्या खात्यात कित्येक कोटी रुपये हस्तांतरीत झाल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या तपासात पुढे आले आहे.

पीएमसी बॅंक घोटाळ्याच्या तपासाची व्याप्ती वाढवत शिवसेनेचे माजी खासदाराविरुद्ध चौकशी सुरू केली आहे. या खासदाराच्या खात्यात कित्येक कोटी रुपये थेट हस्तांतरित झाल्याचे तपासात समोर आले आहे. ईडी त्यांना लवकरच समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावणार आहे. दरम्यान सोमवारी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने सुमारे साडेतीन तास चौकशी केली.प्रवीण राऊत यांच्या एका कंपनीद्वारे एका संस्थेत कोट्यवधी रुपये ट्रान्सफर केले होते. हे ट्रस्ट एका सुप्रसिद्ध राजकीय कुटुंबाद्वारे नियंत्रित केले जातो. या घोटाळ्यात अंडरवर्ल्डची भूमिका असल्याचेही ईडीच्या निदर्शनास आले आहे. एचडीआयएलच्या प्रवर्तक वर्धवान बंधूंनी पीएमसी बँकेकडून घेतलेल्या रकमेचा हा भाग असल्याचे म्हटले जाते. ईडीने आतापर्यंत वर्धवान बंधूंची 1100 एकर जमीन ताब्यात घेतली आहे. यामध्ये जमीन, बंगले, फ्लॅट्स आणि इतर मालमत्तेचा समावेश आहे.

Another former Shiv Sena MP in the PMC Bank scam is facing investigation into the transfer of crores of rupees

याच प्रकरणात खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून चार तास चौकशी करण्यात आली. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*