विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल मधल्या मतदारांनी ममता बॅनर्जींना धक्का दिलाच, पण खरा धक्का तर तामिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाला बसल्याचे चित्र दिसून राहिलेय.ECI Results: Mamata suffers shock in Bengal, but the real shock is for DMK in Tamil Nadu!!
कारण, निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार बंगाल मध्ये भाजपला २८, ममतांच्या तृणमूल काँग्रेसला ८ जागांवर आघाडी दिसते आहे, पण तामिळनाडूमध्ये विजय यांच्या टीव्हीके पक्षाला ४७, अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाला ४४, तर सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाला फक्त २० जागांवर आघाडी मिळाली आहे. याचा अर्थ मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांना तामिळनाडूच्या मतदारांनी तिसऱ्या नंबर वर फेकून दिले आहे.
हा कल असाच राहिला, तर मतदारांनी पश्चिम बंगाल पेक्षा तामिळनाडू मध्ये वेगळाच धक्का दिल्याचे मानावे लागेल.
– इतर राज्यांचे कल
बाकी आसाम मध्ये भाजप ५२, काँग्रेस १५, आणि बाकीच्या पक्षांना १८ जागांवर आघाडी मिळालेली दिसते आहे.
केरळमध्ये काँग्रेसने कम्युनिस्टांना धक्का दिला आहे. तिथे काँग्रेसला ५०, कम्युनिस्टांना २९, मुस्लिम लीगला १७, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला १२ जागांवर आघाडी मिळालेली दिसते आहे.
पुद्दूचेरीत सत्ताधारी भाजप आणि मित्र पक्षच ८ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला ३ जागांवर आघाडी मिळालेली दिसते आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App