भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के, जाणून घ्या तीव्रता


भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतरर लोक घाबरले आणि घराबाहेर पडले.

विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : आज १४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषकाचा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी गुजरातमधील कच्छमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. Earthquake tremors in Gujarat ahead of India Pakistan match

या भूकंपाची तीव्रता 2.6 एवढी होती.  भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतरर लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. मात्र, भूकंपाची तीव्रता खूपच कमी होती, त्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कच्छमधील खवरा येथून १७ किमी अंतरावर रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. याआधीही कच्छमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के बसले आहेत. १  सप्टेंबर २०२३ रोजीही रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री ८.५४ वाजता ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र दुधईपासून १५ किलोमीटर दूर होते. त्याचवेळी दुधई येथेही ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.

अहमदाबादेत भारत-पाकिस्तान सामना; नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये NSGची हिट टीम तैनात, संवेदनशील भागातही पोलिसांचा पहारा

गेल्या २० वर्षांत कच्छमध्ये अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. कच्छ विद्यापीठाच्या संशोधनानुसार, यामागचे मुख्य कारण म्हणजे कच्छमध्ये ४ भूकंप फॉल्ट लाइन्स आहेत. यामध्ये इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेटची सीमा देखील समाविष्ट आहे. आपापसात टक्कर होते आणि त्यामुळे भूकंपाचा धोका निर्माण होतो.

Earthquake tremors in Gujarat ahead of India Pakistan match

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात