विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर समाजवादी पक्षात गृहकलह माजला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना विधान परिषदेच्या ३६ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत चांगळाच झटका बसणार असल्याचे दिसत आहे. Due to the challenges at home, the strongholds of the Samajwadi Party started collapsing, a blow to the Legislative Council
अखिलेश यादव यांनी निवडणुकीपूर्वी आपलीच सत्ता येणार असे वातावरण तयार केले होते. जाट, यादव आणि मुस्लिम अशी मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले. आता मुस्लिम समाजातूनच समाजवादी पक्षाच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.
दुसºया बाजुला अखिलेश यादव यांचे चुलते व प्रगतिशील समाजवादी पाटीर्चे प्रमुख शिवपाल सिंह यादव त्यांच्यावर नाराज आहेत. समाजवादी पक्षाशी संबंध संपविण्याच्या तयारीत आहेत. सपाचे दोन प्रमुख मुस्लीम चेहरे शफीकुर्रहमान बर्क आणि आजम खान हे देखील अखिलेश यांच्या विरोधात गेले आहेत. पक्षाशी संबंधित लोकांना ही उत्सुकता की अखिलेश यादव
आजम खान अनेक दिवसांपासून तुरुंगात आहेत. सपाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांनी शिवपाल आणि आजम खान यांना सोबत घेऊन समाजवादी पार्टी स्थापन केली होती. राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होताच आजम खान अखिलेश यादव यांच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. त्यांनी तुरुंगातून रामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवून विजय मिळवला.
त्यांचा मुलगा अब्दुल्ला आजम हेदेखील स्वार मतदारसंघातून विजयी झाला. सपाला या निवडणुकीनंतर परिस्थिती बदलताना बघावी लागत आहे. कारण अखिलेश यादव पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपासून दूर राहात आहेत. संभलचे सपाचे संसद सदस्य शफीकुर्रहमान बर्क यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले की, पूर्ण सपा मुसलमानांसाठी काम करीत नाही. आम्ही त्यांच्या कामाने समाधानी नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App