वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तान मधून इम्रान खान सरकार गेले असले तरी सत्ता नाट्य थांबले नसून या नाट्यात अजून अनेक वळणे आणि वळसे आले आहेत.Pakistan’s President Arif Alvi suddenly fell ill before Shahbaz Sharif was sworn in
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत शहा मेहमूद कुरेशी आणि शहाबाज शरीफ यांच्यात पंतप्रधान पदासाठी स्पर्धा होती. पण आयत्या वेळेला शहा महमूद कुरेशी यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालून पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीच्या सदस्यांनी नॅशनल असेंब्लीतून वॉक आउट केले. त्यानंतर शहाबाज शरीफ यांची पंतप्रधान पदी निवड करण्यात आली.
त्यांना नॅशनल असेंब्ली च्या 174 सदस्यांची मते मिळाली परंतु पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीच्या नॅशनल असेंब्लीच्या उपाध्यक्षांनी सदनाच्या कामकाजात सहभागी व्हायला नकार दिला आणि अध्यक्षांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे शहाबाज शरीफ यांच्या निवडी विषयाचा शंका उत्पन्न झाली आहे.
दरम्यानच्या काळात पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यांना डॉक्टरांनी पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शहाबाज शरीफ यांना शपथ देण्यापूर्वीच अरिफ अल्वी हे अचानक आजारी पडल्याने शपथग्रहण समारंभावर विशिष्ट राजकीय सावट आले. आरिफ अल्वी यांनी नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांना शहाबाद शरीफ यांना शपथ देण्याचे कर्तव्य करायला बोलावले आहे. रात्री 9.00 वाजता शपथ होण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App