आसाममध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी ‘ड्राय डे’ घोषित!

२२ जानेवारी रोजी अय़ोध्येत भव्य आणि ऐतिहासिक असा राम मंदिर उद्धाटन सोहळा पार पडणार आहे


विशेष प्रतिनिधी 

गुवाहाटी: आसाम सरकारने अयोध्येतील राम लल्लाच्या मूर्तीच्या अभिषेक सोहळ्याच्या दिवशी २२ जानेवारी हा दिवस ‘ड्राय डे’ म्हणून घोषित केला आहे. रविवारी येथे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना पर्यटन मंत्री जयंत मल्ला बरुआ म्हणाले, “आसाम सरकारने राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्त २२ ​​जानेवारी हा दिवस ‘ड्राय डे’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.”Dry day declared in Assam on the day of Ram temple dedication ceremony



अयोध्येतील सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, एनडीए शासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्री आणि 6,000 हून अधिक मह्त्त्वपूर्ण लोक उपस्थित राहणार आहेत.

तर मिसिंग, राभा हासोंग आणि तिवा समुदायांसाठी तीन विकास परिषदांचे आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार वाढवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. “आम्ही या परिषदांसाठी अधिक निधी मिळवण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवू,” असं बरुआ म्हणाले आहेत.

याशिवाय बचत गटांतर्गत नोंदणीकृत महिलांसाठी विद्यमान योजनेंतर्गत सरकारने आर्थिक पॅकेज मंजूर केले आहे. मंत्री म्हणाले, “उद्योजक महिलांना त्यांच्या उपक्रमांसाठी ही मदत होईल. सुमारे ४९ लाख महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.”

Dry day declared in Assam on the day of Ram temple dedication ceremony

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात