DRDO : डीआरडीओने विकसित केलेले कोरोनावरील औषध 2-डीजी बाजारात दाखल झाले आहे. डीआरडीओने विकसित केलेल्या या औषधाची दुसरी बॅच आज निर्माते डॉ. रेड्डीज लॅबने जारी केली. या औषधाच्या एका पाउचची किंमत 990 रुपये आहे. सरकारी रुग्णालये, राज्य व केंद्र सरकारला औषध सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. DRDO 2dg anti covid drug comes in market, one packet costs Rs 990
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : डीआरडीओने विकसित केलेले कोरोनावरील औषध 2-डीजी बाजारात दाखल झाले आहे. डीआरडीओने विकसित केलेल्या या औषधाची दुसरी बॅच आज निर्माते डॉ. रेड्डीज लॅबने जारी केली. या औषधाच्या एका पाउचची किंमत 990 रुपये आहे. सरकारी रुग्णालये, राज्य व केंद्र सरकारला औषध सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
डॉ. रेड्डीज लॅबने दहा हजार पाकिटांची औषधाची दुसरी बॅच जारी केली. डीआरडीओ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार औषध व्यावसायिकदृष्ट्या उपलब्ध होईल. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) आपत्कालीन वापरासाठी हे औषध मध्यम ते गंभीर कोरोना रुग्णांमध्ये सहायक थेरपी म्हणून मंजूर केले आहे. केंद्राचे म्हणणे आहे की, डीआरडीओने विकसित केलेले औषध 2-डीजी कोरोना असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी खूप उपयुक्त ठरेल.
संरक्षण मंत्रालयाने अलीकडेच म्हटले आहे की, डीआरडीओचे औषध लोकांचे जीवन वाचवू शकते. यामुळे रुग्णांच्या उपचारास मदत होईल. ज्यामुळे रुग्णालयात जाण्याची वेळ ओढवणार नाही. हैदराबादच्या डॉक्टर रेड्डीज लॅबच्या सहकार्याने डीआरडीओच्या प्रयोगशाळा, न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस या संस्थेने कोरोना वैद्यकीय वापरासाठी औषध विकसित केले आहे. हे औषध पाउचमध्ये पावडरच्या स्वरूपात येते. ते पाण्यात विरघळून रुग्णांना दिले जाते.
DRDO 2dg anti covid drug comes in market, one packet costs Rs 990
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App