क्रिप्टोकरन्सी चुकीच्या हातात जाऊन युवकांचे जीवन बरबाद करू नका; पंतप्रधान मोदींचा सिडनी डायलॉगमध्ये इशारा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सी किंवा बिटकॉइन यांच्यासारखे आभासी चलन चुकीच्या हातात जाऊन युवकांचे जीवन बरबाद होऊ देता कामा नये, असा गंभीर इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिडनी डायलॉगमध्ये दिला आहे. Don’t ruin the lives of young people by getting cryptocurrency into the wrong hands; PM Modi’s warning in Sydney dialogue

आंतरराष्ट्रीय सुरक्षा विषयक सिडनी डायलॉगमध्ये विविध देशांचे प्रमुख आणि धोरणकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी आर्थिक सुरक्षा, सायबर सुरक्षा आंतरराष्ट्रीय कायदा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा महत्व या विषयावर विचार मांडले.

त्यामध्ये क्रिप्टोकरन्सी अथवा बिटकॉइन अर्थात आभासी चलन यापासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेला कसा धोका निर्माण झाला आहे, आर्थिक सुरक्षित गुंतवणूकीवर कसा परिणाम झाला आहे, याचे वर्णन केले. क्रिप्टोकरन्सी चुकीच्या हातात जाऊ देऊन युवकांचे जीवन बरबाद होऊ देता कामा नये, असा गंभीर इशारा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.



भविष्यकाळात राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्राचे हित आणि सायबर सुरक्षा त्याच वेळेला आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणूक याविषयी अधिक सजग राहून सर्व देशांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. याकडे पंतप्रधान मोदी यांनी सर्व राष्ट्रप्रमुख यांचे लक्ष वेधले. क्रिप्टोकरन्सीचा वापर ड्रग्ज आणि शस्त्रास्त्र तस्करीत वाढल्याची पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाला पार्श्वभूमी आहे. त्यामुळे त्यांनी त्यापासून उत्पन्न होणाऱ्या धोक्याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले आहे.

Don’t ruin the lives of young people by getting cryptocurrency into the wrong hands; PM Modi’s warning in Sydney dialogue

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात