वृत्तसंस्था
अगरताळा :न्यायालयाचा अवमान होतोय म्हणून घाबरून जाऊन लोकांची कामे टाळू नका, असा सल्ला त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देब यांनी नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच अटकेची भीती मुळीच बाळगू नका, कारण पोलिस आमच्या ताब्यात आहेत, असे ते म्हणाले आहेत.Don’t be afraid of contempt of court, the police are under our control; Tripura Chief Minister advises officials
त्रिपुरा सिव्हिल सर्व्हिस ऑफिसर्स असोसिएशनच्या २६ व्या द्विवार्षिक परिषदेत ते बोलत होते.ते म्हणाले, पोलिसावर आमचे कंट्रोल आहे. तुम्ही सांगा किती लोक न्यायलयाचा अवमान केला म्हणून तुरुंगात गेलेत. न्यायालयाने पकडण्यासाठी पोलिस पाठवले तर ते सांगतील आरोपी मिळाला नाही.
पोलिस आमच्या नियंत्रणात आहेत. त्यामुळे कोणाला काही एक घाबरण्याची गरज नाही. न्यायालयाचा अवमान हा वाघाप्रमाणे मानला गेला पाहिजे. मी येथे वाघ आहे कारण माझ्या हातात सत्तेची पॉवर आहे. तुरुंगात जाणार असेन तर प्रथम मी जाईन. तुम्ही घाबरू नका.
सर्वोच्च न्यायालय दखल घेईल का?: टीएमसी
टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी मुख्यमंत्र्याचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी ट्विट केले की हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. ते निर्लज्जपणे लोकशाहीची थट्टा करत आहे. अनादर करणाऱ्या टिप्पणीची सर्वोच्च न्यायालय दखल घेईल का?
माकपचे नेते जितेंद्र चौधरी म्हणाले की, न्यायव्यवस्था आपल्या लोकशाहीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे. त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते की ते न्यायव्यवस्थेचा आदर करत नाहीत. हे विधान त्यांची निराशा दर्शवते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App