राज्यसभेसाठी भाजपचे केंद्रीय मंत्री सोनोवाल यांची आसाममधून, तर सेल्वागणबथी यांची पुदुचेरीतून बिनविरोध निवड

BJP Leader S. Selvaganabathy from Puducherry and sarbananda sonowal elected unopposed to rajya sabha

rajya sabha : सोमवारचा दिवस भाजपसाठी महत्त्वाचा ठरला आहे. पुदुचेरीतून भाजप उमेदवार एस. सेल्वागणबथी यांची, तर केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची आसाममधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. आसामच्या जागेसाठी रिंगणात असलेले एकमेव उमेदवार सोनोवाल यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात निवडून आल्याचे घोषित केले.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सोमवारचा दिवस भाजपसाठी महत्त्वाचा ठरला आहे. पुदुचेरीतून भाजप उमेदवार एस. सेल्वागणबथी यांची, तर केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची आसाममधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. आसामच्या जागेसाठी रिंगणात असलेले एकमेव उमेदवार सोनोवाल यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात निवडून आल्याचे घोषित केले. यासह आसाममधून वरच्या सभागृहात सत्ताधारी भाजपचे संख्याबळ तीन झाले, तर त्यांचे सहयोगी असम गण परिषदेचे (एजीपी) राज्यसभेत एक सदस्य आहे. आसाममध्ये राज्यसभेच्या एकूण सात जागा असून त्यापैकी दोन जागा काँग्रेसकडे आणि एक अपक्ष खासदारांकडे आहे.

मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष भावेश कलिता यांच्यासह सोनोवाल यांनी दुपारी विधानसभेच्या आवारातून निवडणूक अधिकाऱ्यांकडून निवडणुकीचा दाखला घेतला. पत्रकारांशी बोलताना सोनोवाल म्हणाले की, राज्याच्या भल्यासाठी आणि नागरिकांच्या उन्नतीसाठी काम सुरू राहील. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांचे आभार मानले. ते म्हणाले, “आसामच्या लोकांचा आणि विशेषतः माजुली लोकांच्या माझ्यावरील अतूट विश्वासाबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो.”

दुसरीकडे, भाजपाध्यक्ष जेपी नड्ड यांनीही दोन्ही खासदारांचे अभिनंदन केले. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “ऐतिहासिक! राज्यसभेवर भाजपचे पुदुचेरीतून पहिलेवहिले खासदार एस. सेल्वागणपती जी यांचे मी अभिनंदन करतो. सर्वानुमते त्यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाली. शिवाय सर्बानंद सोनोवालजी यांचेही आसाममधून बिनवरोध निवडीबद्दल अभिनंदन!”

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!