तुम्ही करत असलेल्या कामाबद्दलची तुमच्या मनात असणारी प्रेरणा, हेतू हे तुमच्या यशाची दिशा ठरवतं. तसंच मानसिक समाधानही ठरवतं. सकारात्मक लोकं कामाकडं वेगळ्या नजरेनं बघतात. लोकांच्या बोलण्यातून त्यांची कामाबद्दलची भावना व्यक्त होत असते.I want to give something,’ keep the feeling
नैराश्यवादी लोकांना ‘सध्या काय चाललंय,’ असं विचारल्यानंतर…ऑफिसमध्ये काम करणारी एखादी व्यक्ती म्हणते, ‘‘काय चालणार. आठ तास पाट्या टाकायच्या दुसरं काय?’’ एखादा कॉलेज मधला विद्यार्थी म्हणतो, ‘‘फक्त लॉग-ईन टाकायचं. व्हिडिओ ऑफ असल्यामुळं सरांना काही कळत नाही काय करतोय ते!’’ एखादा ज्येष्ठ नागरिक म्हणतो, ‘‘आलेला दिवस ढकलतोय. बाकी काही नाही,’’
नव्या मंदिराच्या उभारणीच्या ठिकाणी, छिन्नी हातोडा घेऊन काम करणाऱ्या माणसाला विचारलं, ‘तू काय करतोयस?’ एक जण म्हणाला, ‘मी दगड फोडतोय’, तर दुसरा म्हणाला, ‘मी दगडात लपलेली मूर्ती, बाहेर काढतोय!’ सैन्यदलातील जवानाला विचारलं, ‘तुम्ही कुठे नोकरी करता?’ तो जवान अभिमानाने म्हणाला, ‘मी नोकरी करत नाही. तर देशसेवा करतो.’
आपल्या कामाबद्दल नकारात्मकतेची भावना ठेवण्याऐवजी त्यामुळं समाजात कोणता सकारात्मक बदल होऊ शकतो याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. तुमच्या कामामुळं समाजात कोणता सकारात्मक बदल होऊ शकतो, याचा विचार करा. प्रत्येक कार्याचं कारण असतं आणि परिणामही असतो. तुमच्या कामामधील ‘उदात्त हेतू अर्थात नोबल कॉझ’स्वतःलाच लक्षात आला, तर तो जगण्याला प्रेरणा देतो. यामुळं काम करण्यात उत्साह येतो. ‘मला काहीतरी हवं आहे,’ या अपेक्षेपेक्षा, ‘मला काही तरी द्यायचं आहे,’ ही भावना मनात सकारात्मकता निर्माण करते. तुम्ही करत असलेल्या कामाकडं या नव्या नजरेनं पाहा. म्हणजे त्या कामाला आणि जगण्याला नवा अर्थ प्राप्त होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App