राज्यातले विविध जातीसमूह आरक्षणाची मागणी करत आहेत. काही जाती सध्या त्यांना लागू असलेल्या आरक्षण प्रवर्गात बदल करण्याची मागणी करत आहेत. यात राज्य मागासवर्गीय आयोगाची भूमिका महत्त्वाची असते. याच आयोगावर चुकीची माहिती देत तसेच राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवर यांच्या ओळखीचा फायदा घेत लक्ष्मण हाके यांनी स्वतःची वर्णी लावून घेतल्याचा आरोप आहे. The Dhangar organization has accused Laxman Hake of using lies and political affiliation to get position in to the State Backward Classes Commission of Maharashtra.
प्रतिनिधी
पुणे : “राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मण हाके हे प्राध्यापक नाहीत. ते ठेकेदार आहेत. त्यांनी पद मिळवण्यासाठी शासनाला खोटी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीची सत्यता न तपासताच त्यांना सचिव दर्जाचे पद बहाल करण्यात आले. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांचे समर्थक म्हणून ओळख सांगत हाके यांनी ही बेकायदेशीर नियुक्ती मिळवली आहे,” असा आरोप धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केला.
या प्रकरणाची चौकशी करुन हाके यांची नियुक्ती रद्द करावी तसेच त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ढोणे यांनी सोमवारी (दि. 27) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केली. प्रा. लक्ष्मण हाके यांनी राज्य शासनाकडे सादर केलेले परिचयपत्र, त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र यांच्या आधारे ढोणे यांनी हा आरोप केला. “राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांच्या कागदपत्रांची पडताळणी, तसेच चारित्र्याची पडताळणी करून अपात्र सदस्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी गांधी जयंतीपासून पुण्यातील राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहे,” असे ढोणे म्हणाले.
हाकेंनी जन्मतारीख का दडवली?
“लक्ष्मण हाके यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी सलगी करून हे पद मिळवले असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. त्यामुळेच हाके यांच्या सर्व अपात्रतांकडे दुर्लक्ष करण्यात आले. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे खोट्या माहितीकडे कानाडोळा करण्यात आला. यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिली आहे. हाके यांनी परिचयपत्रात जन्मतारीख दडवली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाची वयोमर्यादा किमान ४५ व कमाल ६० वर्षे आहे. मात्र, हाके यांचे वय ४५ पेक्षा कमी असून ते कळून येऊ नये म्हणून त्यांनी जन्मतारीख लिहिलेली नाही,” असे ढोणे यांनी सांगितले.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या
“राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती कायदेशीर व्हावी. आयोगाला पायाभूत सुविधा व पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी ४३१ कोटींचा निधी तातडीने वितरित करावा,” या प्रमुख मागण्या असल्याचे ढोणे म्हणाले.
The Dhangar organization has accused Laxman Hake of using lies and political affiliation to get position in to the State Backward Classes Commission of Maharashtra.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App