ब्रिटनमध्ये इंधन टंचाईचा उडाला भडका; शहरांतील ९० टक्के पंपात खडखडाट; नागरिक झाले हवालदिल


वृत्तसंस्था

लंडन : ब्रिटनमध्ये इंधन टंचाईचा भडका उडाला आहे. अनेक शहरांतील ९० टक्के पंपात इंधनाचा खडखडाट झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.Fuel shortages erupt in Britain; In cities 90 percent pump dry; citizens panic

युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडला होता आणि कोरोना संकटाचा सामना करताना ब्रिटनची दमछाक झाली. या दोन कारणामुळे इंधन वाहतूक करणाऱ्या चालकांचा तुटवडा निर्माण झाल्याने हे इंधन संकट ब्रिटनवर कोसळले आहे. त्यामुळे प्रमुख शहरातील ९० टक्के पंपावर इंधनाचा खडखडाट निर्माण झाला आहे. पंपावर इंधन नाही, क्षमा करा, असे बोर्ड लागले आहेत. त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेतसध्या इंधनाचा तुटवडा निर्माण होत असताना ऐन नाताळमध्ये इंधन आणि मालवाहतूक करणाऱ्या लॉऱ्या वेळेत धावल्या नाहीत तर इंधनाबरोबरच अन्नधान्याचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कापड उद्योगाचे महेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मँचेस्टरमध्ये प्रथम इंधन टंचाईचा भडका उडाला आहे.

केवळ मँचेस्टरच नव्हे तर अन्य प्रमुख शहरात इंधनाचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटनमध्ये अक्षरशः हाहाकार उडाला आहे. इंधनासाठी लोक आता आकांड तांडव करत आहेत.

पाच हजार चालकांना तात्पुरता व्हिसा

इंधन वाहनाचे चालक मिळत नसल्याने हे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने परदेशातील चालकांना ब्रिटनमध्ये तात्पुरता व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला पाच हजार चालकांना तो देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे माल आणि इंधनाची समस्या सुटेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

Fuel shortages erupt in Britain; In cities 90 percent pump dry; citizens panic

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात