महाराष्ट्राच्या महिला, पुरुष क्रिकेट संघाची घोषणा


कोरोना महामारीमुळे रखडलेल्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आता पुन्हा खेळवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने एकोणीस वर्षाखालील महिला-पुरूष संघांची निवड सोमवारी (दि. 27) केली. Maharashtra Under-19 Cricket teams declared….Ready to fire in season 2021


प्रतिनिधी

पुणे : एकोणीस वर्षांखालील क्रिकेट स्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष क्रिकेट संघाची घोषणा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकडून सोमवारी करण्यात आली. महाराष्ट्राचा पुरुषांचा संघ विनू मंकड एलिट गट ‘ब’ मध्ये २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान दिल्ली येथे खेळणार आहे. अभिषेक पवारकडे पुरुष संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ईशा पाठारे महिला क्रिकेट संघाची कर्णधार असणार आहे.

पुरुष संघाचा सलामीचा सामना येत्या मंगळवारी तमिळनाडूविरुद्ध रंगणार आहे. महिलांचा संघ एकदिवसीय चषक क्रिकेट स्पर्धेत एलिट गट ‘ड’मध्ये खेळणार आहे. २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२१ दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. महिला संघाचा सलामीचा सामना सौराष्ट्रविरुद्ध मंगळवारी होणार आहे. महाराष्ट्राचे दोन्ही संघ पुढीलप्रमाणे –



पुरुष संघ : अभिषेक पवार (कर्णधार), सोहम शिंदे, अर्शिन कुलकर्णी, अनिरुद्ध साबळे, अश्कन काझी, अखिलेश गवळे, अजय भोरुडे, विकी ओस्तवाल, किरणे चोरमले, सचिन धस (उपकर्णधार), कुशल तांबे, अभिषेक निषाद, अभिनंदन गायकवाड, शुभम खरात, राजवर्धन हंगार्गेकर, अमन दोषी, शोएब सय्यद, ऋषभ बन्सल, नचिकेत ठाकूर, कार्तिक बलिया.

महिला संघ : ईशा पाठारे (कर्णधार), श्रावणी देसाई (उपकर्णधार), ईश्वरी सावकार, साक्षी कानडी, अंबिका वाटाडे, खुशी मुल्ला, सौम्यलता बिरादार, स्वांजली मुळे, संजना वाघमोडे, जाई देवन्नावर, भक्ती मिरजकर, श्वेता सावंत, रसिका शिंदे, समृद्धी बानवणे, उत्कर्षा कदम, श्रृती महाबळेश्वरकर, चिन्मयी बिरफाळे, श्वेता पवार, श्रेया गडाख.

Maharashtra Under-19 Cricket teams declared….Ready to fire in season 2021

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात