आम्ही शांत बसणार नाही, अफगाणिस्तानातील महिला आता अजिबात अरेरावी सहन करणार नाहीत ; उद्योजिकेचे शफिक अताई यांचे वक्तव्य


विशेष प्रतिनिधी

हेरात : तालिबान सरकार आल्यापासून त्यांनी महिलांना सार्वजनिक जीवनात बरीच बंधने घातली आहेत. अफगाणिस्तानातील एक प्रमुख उद्योजिकीने या विरुद्ध आवाज उठवला आहे. शफिक अताई या उद्योजकीकडे १०० महिला काम करतात. ‘ मी माझ्या कर्मचाऱ्यांच्या हक्कांविषयी बोलणारचं. तालीबानी सत्ता असली तरी आम्ही शांत बसणार नाही. कट्टरपंथीय या ऑगस्टमध्ये सत्तेत आल्यानंतर महिलांना सार्वजनिक जीवनातून बाहेर पडण्यास भाग पडत आहेत. काही महिला उद्योजक देश सोडून गेल्या आहेत तर काही लपून बसल्या आहेत’ असे शफिक अताई म्हणाल्या.

“We won’t remain silent now” ; Afghan Women Business leader on Taliban rule

१९९६ ते २००१ या काळात महिलांना शाळेत जाणे आणि कामासाठी जाणे यावर बंदी घातली होती. तसेच घराबाहेर पडताना पुरुष नातेवाईकाला बरोबर घेणे बंधनकारक होते. तसा काळ परत येईल अशी महिलांना आत्ता पुन्हा भीती वाटत आहे. शफिक अताई यांनी हेरात मध्ये २००७ ला केशर कंपनी काढली होती. त्या म्हणाल्या की, आम्ही आवाज उठवणार व तो सत्ताधाऱ्यांच्या कानांपर्यंत पोहोचेल असे पाहू. “आम्ही आतापर्यंत खूप मेहनत घेतली आहे आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही आता घरात बसणार नाही ” असे त्या म्हणाल्या.


AFGANISTAN : तालिबानची कथनी एक करनी एक : शांततेचे आश्वासन देऊन तालिबानचा काबूल विमानतळावर महिला आणि मुलांवर हल्ला


 

अताई यांची कंपनी ही जगातील सर्वात महाग मसाल्याचे उत्पादन, पॅकिंग तसेच निर्यातीचा उद्योग केवळ महिला कर्मचाऱ्यांना घेऊन करत आहे. इराणजवळील हेरात प्रांतातील जिल्ह्यात ६९ एकर क्षेत्रात १००० पेक्षा जास्त महिला काम करत आहेत. तसेच केशर उद्योगात काम करणाऱ्या महिलांची एक संस्था अताईने स्थापन केली आहे. ही संस्था त्यांच्या मालकीच्या ५५ हेक्टर क्षेत्रावर केशर लागवड करत आहे. यामुळे महिला कमाई करून घर चालवत आहेत. मुलांना शाळेत पाठवणे, कपडे इ. जीवनावश्यक वस्तूंसाठी खर्च करू शकतात.

४० वय असलेल्या या महिलेने सांगितले की “आम्ही शांत बसणार नाही.” त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले तरी आम्ही शांत बसणार नाही. आवाज उठवणारचं.”

अफगाणिस्तानातील एकूण केशर उत्पादनात हेरात प्रांत आघाडीवर आहे. अताईना फक्त आपल्या उद्योगाबाबत काळजी आहे असे नाही तर अफगाणिस्तानातील महिला ज्या अवघड परिस्थितीत आहेत त्याची काळजी आहे. नोकरी, शिक्षण व सरकारमध्ये प्रतिनिधित्व या सर्वाबाबत अनिश्चितता आहे. २० वर्षं महिलानी घेतलेली मेहनत फुकट जाऊ नये असे त्या म्हणाल्या.

“We won’t remain silent now” ; Afghan Women Business leader on Taliban rule

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”