AFGANISTAN : तालिबानची कथनी एक करनी एक : शांततेचे आश्वासन देऊन तालिबानचा काबूल विमानतळावर महिला आणि मुलांवर हल्ला


तालिबाननं अफगाणिस्तानावर आपला ताबा मिळवल्यानंतर देशातील स्थिती अत्यंत बिकट बनत चालली आहे. तालिबानी बंडखोरांच्या हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत.


वृत्तसंस्था

काबूल : तालिबाननं अफगाणिस्तानावर आपला ताबा मिळवल्यानंतर देशातील स्थिती अत्यंत बिकट बनत चालली आहे. असंख्य लोकं देश सोडण्यासाठी धडपड करत आहेत. अशात तालिबानी बंडखोरांच्या हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. यानंतर काबूल विमानतळ परिसरात तालिबान संघटनेच्या काही बंडखोरांनी अफगाण नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात महिलांसह काही लहान लेकरं देखील जखमी झाले आहेत. शांतता राखण्याचं वचन दिल्यानंतरही हिंसाचाराची ही घटना समोर आली आहे.AFGANISTAN:Taliban attack women, children at Kabul airport despite peace promise

https://twitter.com/yamphoto/status/1427704925379760134?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1427704925379760134%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-2665485013417739938.ampproject.net%2F2108052321001%2Fframe.html

या घटनेचे काही फोटोज सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहेत. या फोटोंत स्पष्टपणे दिसत आहे की, देश सोडून जाण्याच्या उद्देशानं जमलेल्या महिला आणि लहान मुलांवर तालिबान्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका महिलेसह तिचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. तालिबान बंडोखोरांनी विमानतळावरून जमावाला माघारी लावण्यासाठी गोळीबार देखील केल्याची माहिती समोर आली आहे. लॉस एंजेलिस टाइम्सचे रिपोर्टर मार्कस यम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे फोटो ट्वीट केले असून फोटोतील जखमी लोकं तालिबानच्या हल्ल्यात रक्तबंगाळ केल्याचा दावा केला आहे.

याव्यतिरिक्त फॉक्स न्यूजनं एक व्हिडीओदेखील जारी केला आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, तालिबान बंडखोर काबूलच्या रस्त्यावर विविध ठिकाणी फिरत आहेत. ते माजी सरकारी कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहेत. या दरम्यान ते अनेक ठिकाणी गोळीबार देखील करत आहेत. वृत्तवाहिनीनं असाही दावा केला की, तालिबाननं मंगळवारी तखर प्रांतात एका महिलेची हत्या केली आहे. संबंधित महिला तोंड उघडं ठेवून घराबाहेर आली होती. त्यामुळे तालिबान्यांनी हा हल्ला केला आहे.

काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबाननं पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘महिलांना आम्ही आमच्या व्यवस्थेत समाविष्ट करणार आहोत एवढंच नाही तर त्यांना शिक्षणाचाही अधिकार देणार आहोत. महिला आपल्या समाजाचा पाया आहेत ही बाब आम्हाला ठाऊक आहे त्यामुळेच त्यांना समाजाच्या प्रगतीसाठी यंत्रणेत समाविष्ट करून घेतलं जाईल. शरिया कायद्यानुसार आम्ही महिलांच्या हक्कांचं रक्षण करू. महिला आमच्या सरकारमध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात.

AFGANISTAN:Taliban attack women, children at Kabul airport despite peace promise: Report

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात