आरोग्य सचिव आणि आरोग्य शिक्षण संचालकांच्या राजीनाम्यांवर आहेत ठाम
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या ( West Bengal ) आरजी कर मेडिकल कॉलेजचे प्रकरण चर्चेत आहे. प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरावर झालेल्या अत्याचाराचा निषेध करणाऱ्या कनिष्ठ डॉक्टरांनी अद्यापही आंदोलन थांबवलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून अद्याप न्याय न मिळाल्याने काम करणार नसल्याचे सांगितले.
आंदोलक डॉक्टरांनी सांगितले की, आम्हाला आरोग्य सचिव आणि आरोग्य शिक्षण संचालकांचे राजीनामे हवे आहेत. मंगळवारी दुपारी सॉल्ट लेकमधील आरोग्य विभागाचे मुख्यालय असलेल्या आरोग्य भवनापर्यंत रॅलीही काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आंदोलक डॉक्टर म्हणाले की, आमच्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. मृताला न्याय मिळालेला नाही. आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. आरोग्य सचिव आणि डीएचई यांनी राजीनामा द्यावा अशी आमची इच्छा आहे. आज दुपारी आरोग्य भवनपर्यंत रॅली काढणार आहोत.
कनिष्ठ डॉक्टर जवळपास महिनाभर काम करत नाहीत. एक दिवस आधी सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांना तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. कर्तव्य सोडून आंदोलन करता येत नाही, असे ते म्हणाले. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने आंदोलनकर्त्या डॉक्टरांना संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कामावर परतण्याचे निर्देश दिले होते. सायंकाळपर्यंत डॉक्टर कामावर आले तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी ग्वाही न्यायालयाने दिली होती.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील लाल बाजार येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ८ आणि ९ ऑगस्टच्या मध्यरात्री एका कनिष्ठ महिला डॉक्टरवर बलात्कार झाला होता. यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये ९ ऑगस्ट रोजी सकाळी डॉक्टरचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाजवळ त्यांचा मोबाईल आणि लॅपटॉपही पडलेला होता. पीएम रिपोर्टमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार झाल्याची पुष्टी झाली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. SIT ने संजय रॉयला अटक केली, जो रात्री रुग्णालयात कर्तव्यावर होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App