पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम मतांच्या जोरावर सत्तेवर पुन्हा येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या ममता बॅनर्जी यांना जोरदार झटका बसला आहे. पीरजादा शरीफ या बंगालमधील सर्वात मोठ्या मशीदीच्या धर्मगुरूंमध्येच निवडणुकीत कोणाला मते देण्यासाठी फतवा काढायचा यावरून मतभेद झाले आहेत. आम्ही ममता बॅनर्जी यांना निवडून देण्याचा मक्ता घेतला नाही, असे एका धर्मगुरूने म्हटले आहे. Do Muslims have compulsion to elect Mamata? Question from Furfura Sharif’s clergy
विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम मतांच्या जोरावर सत्तेवर पुन्हा येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या ममता बॅनर्जी यांना जोरदार झटका बसला आहे. पीरजादा शरीफ या बंगालमधील सर्वात मोठ्या मशीदीच्या धर्मगुरूंमध्येच निवडणुकीत कोणाला मते देण्यासाठी फतवा काढायचा यावरून मतभेद झाले आहेत. आम्ही ममता बॅनर्जी यांना निवडून देण्याचा मक्ता घेतला नाही, असे एका धर्मगुरूने म्हटले आहे.
फुरफुरा शरीफ या बंगालमधील सर्वात मोठ्या मशीदीचे ज्येष्ठ पीर कुतुबुद्दीन सिद्दीकी यांनी कोणत्याही प्रकारचा फतवा काढण्यास विरोध केला आहे. याचे कारण म्हणजे कुतुबुद्दीन यांचे पुतणे पीरजादा अब्बास यांनी इंडियन सेक्युलर फ्रंट नावाने नवीन पक्ष काढला आहे. डावे पक्ष आणि कॉँग्रेसबरोबर आघाडी करून ३० जागाही लढवित आहे.
आजपर्यंत पीरजादा शरीफच्या पीर घराण्यातील कोणीही प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेतलेला नव्हता. त्यामुळे सिद्दीकी कुटुंबात कोणाला समर्थन द्यायचे यावरून वाद सुरू झाले आहेत. कुटुंबातील ज्येष्ठांना ममता बॅनर्जी यांना पाठिंबा द्यायचा आहे; परंतु तरुण पिढी त्यांचे ऐकायला तयार नाही. त्यांनी पीरजदादा अब्बासच्या बरोबर जाण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला आहे. ममतांची मदार मुस्लिम मतांवर आहे. पीरजादा अब्बास यामुळे मुस्लिम मते कॉँग्रेस आणि डाव्या पक्षांकडे गेल्यास तृणमूल कॉँग्रेसला त्याचा चांगलाच फटका बसू शकतो.
पीरजादा अब्बास म्हणाले मुस्लिमांनी ममता बॅनर्जी यांना निवडून देण्याचा मक्ता घेतलेला नाही. त्यांनाही कोणाची निवड करावी हे स्वांतत्र्य आहे. ममता बॅनर्जी यांच्या शासनकाळात तृणमूल कॉँग्रेसमध्ये गुंडगिरी वाढली आहे. सर्वत्र काळाबाजार सुरू आहे. भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळे अनेक तरुण मुस्लिम नेत्यांनी तृणमूलचा त्याग केला आहे. ते ममता बॅनर्जी यांना मतदान करणार नाहीत.
महत्त्वाची बातमी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App