एम. के. स्टालिन यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात 33 मंत्र्यांचा समावेश

DMK Chief MK Stalin takes oath as the Chief Minister of Tamil Nadu

MK Stalin takes oath : द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टालिन यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. स्टालिन यांनी प्रथमच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. स्टालिन हे गृह, सार्वजनिक व सामान्य प्रशासनासहित इतरही विभाग सांभाळणार आहेत. स्टालिन यांच्या समवेत 33 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. DMK Chief MK Stalin takes oath as the Chief Minister of Tamil Nadu


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टालिन यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. स्टालिन यांनी प्रथमच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. स्टालिन हे गृह, सार्वजनिक व सामान्य प्रशासनासहित इतरही विभाग सांभाळणार आहेत. स्टालिन यांच्या समवेत 33 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

स्टालिन यांच्या मंत्रिमंडळात 33 सदस्यांचा समावेश आहे. या 33 सदस्यांपैकी 15 जण प्रथमच मंत्री बनले आहेत. स्टॅलिन यांनी या मंत्रिमंडळात दपराईमुरुगन यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना कायम ठेवले आहे. द्रमुक नेते आणि पक्षाचे सचिव दपराई मुरुगन जलसंपदामंत्री असतील. आधीच्या सरकारमध्ये 2006-11 मध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.

या वेळी मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्या 18 मंत्र्यांपैकी दुरुईमुरुगन हेही आहेत. त्याचवेळी चेन्नईचे माजी महापौर एम. सुब्रमण्यम आणि पक्षाचे नेते पी. के. सेकराबाबू पहिल्यांदा मंत्री होतील. मिळालेल्या माहितीनुसार, सुब्रमण्यम यांना आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, तर सेकराबाबूंना हिंदू धार्मिक व धर्मादाय व्यवस्थापन विभाग देण्यात आला.

मंत्रिमंडळात या 33 जणांचा समावेश

पी.के. सेकराबाबू, एस. एस. नासार, चेन्नईचे माजी महापौर सुब्रमण्यम, द्रमुकचे माजी सचेतक सखापनी, पीके मूर्ती, आर. गांधी, एस.एस. शिवशंकर, पलानीवेल त्यागराजन, अनिबल महेश मोय्यामोजी, शिव व्ही. मयनाथन, सी. व्ही. गणेशन आणि टी. मनो थांगराज आहेत. मंत्रिमंडळात दोन महिला प्रतिनिधीही आहेत यात गीता जीवन आणि एन. क्लायवीजी सेल्वराज यांचा समावेश आहे.

DMK Chief MK Stalin takes oath as the Chief Minister of Tamil Nadu

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात