विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताला परदेशातून मोठ्या प्रमाणात कोरोनापासून बचाव करण्यासाठी मदत मिळत आहे. या मदतीमध्ये राजकारण होताना दिसत असल्याची टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली . त्यांनी केंद्राला परदेशातून मिळणाऱ्या मदतीबाबत विचारणा केली.
ज्याचे उत्तर केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी दिले आहे.आपल्या उत्तरात संपूर्ण तपशील जोडत त्यांनी राहुल गांधी यांना राजकारणाच्या पलीकडे विचार करण्याचा सल्ला देखील दिला आहे .
गुरुवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्वीट केले की,मिस्टर राहुल गांधी, राजकारणापेक्षा वरती उठण्याची वेळ आली आहे. ३१ राज्यातील ३८ संस्थांना केलेल्या वितरणाची माहिती सार्वजनिक व्यासपीठावर आपल्या ट्विटच्या आधीच उपलब्ध आहे. आपल्या म्हणण्यानुसार,आपल्याला सत्याची काळजी असल्यास, कृपया ही माहिती सामायिक करा.
स्मृती इराणी यांनी आपल्या यासह सरकारचे एक प्रसिद्धी पत्रकही शेअर केले असून,यात विदेशातून आलेली मदत सामग्री कोणत्या राज्यातील कोणत्या हॉस्पिटलला पाठविण्यात आली आहे याची माहिती देण्यात आली आहे. हे पत्रक ४ मे रोजीचे आहे. राहुल गांधींच्या ट्विटला स्मृति इराणींनी ५ मे रोजी उत्तर दिले.
Time to rise above petulant politics Mr. @RahulGandhi. Information regarding allocation to 38 institutions across 31 states / UTs was available in the public domain before you tweeted. If you care for the truth as you proclaim, do share – https://t.co/8LhL4lU8OV https://t.co/Flc9QXuU0u — Smriti Z Irani (Modi Ka Parivar) (@smritiirani) May 6, 2021
Time to rise above petulant politics Mr. @RahulGandhi. Information regarding allocation to 38 institutions across 31 states / UTs was available in the public domain before you tweeted. If you care for the truth as you proclaim, do share – https://t.co/8LhL4lU8OV https://t.co/Flc9QXuU0u
— Smriti Z Irani (Modi Ka Parivar) (@smritiirani) May 6, 2021
राहुल गांधीचे ट्विट
भारताला आतापर्यंत किती परदेशी मदत मिळाली? मिळालेल्या सेवा कोठे आहेत? परदेशातून मिळालेल्या मेडिकल साहित्यांचा फायदा कोण घेत आहे? साहित्यांची राज्यनिहाय विभागणी कश्याप्रकारे करण्यात आली? जर हे केले असेल तर यात पारर्शकता का दिसून येत नाही? याचे मोदी सरकारकडे उत्तर आहे का?
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी देशातील कोरोना स्थितीबद्दल सरकारवर निशाणा साधला होता. मोदी सरकार लोकांना लस आणि नोकऱ्या पुरविण्यात अपयशी ठरल्याचा आरोप राहुल गांधींना केला.त्यांच्या या आरोपांचे खंडन करत स्मृति इराणी यांनी केंद्राच्या कार्याचे तपशील राहुल गांधीना देत त्यांची बोलती बंद केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more