विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृति इराणी या आपल्या भाषणांसाठी प्रसिध्द आहेत. त्यांच्या भाषणांपासून अभिनेत्री दिव्या खोसला हिने प्रेरणा घेतली आहे. सत्यमेव जयते २ या चित्रपटात दिव्या एका राजकारणी महिलेची सशक्त भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी दिव्याने स्मृति इराणी यांच्या भाषणांची अनेक पारायणे केली.Divya Khosla Inspired by Smriti Irani’s speech, politician role in Satymev Jayte2
दिव्याने अनिल शर्माच्या अब तुम्हारे हवाले वतन साथियो मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर दिव्या खोसला मिलाप मिलन झवेरी यांच्या सत्यमेवा जयते 2 मध्ये दिसणार आहे. दिव्या तितच्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाली, मिलापने मला भूमिकेबद्दल सांगितले. मला विद्या या एका सशक्त राजकारणी महिलेची भूमिका साकारायची होती.
महिला सक्षमीकरणाच्या लढ्यातील ती अग्रणी असते. त्यामुळे माझ्यापुढे एकच नाव होते ते म्हणजे मी स्मृति इराणी. मी त्यांची अनेक भाषणे पाहिली. त्यांची बोलण्याची लकब, आक्रमकपणा यांचा अभ्यास केला.
दिव्या म्हणाली याबरोबरच मी आंधीपासून अनेक चित्रपटही पाहिले. या चित्रपटांमध्ये राजकारणी महिलांच्या भूमिका आहेत. मला विद्या तिच्यावरच घडवायची होती. ती लखनौची मुलगी आहे, जी खूप मजबूत आहे. त्यामुळे माझ्यासाठी आव्हानात्मक गोष्ट होती.
दिव्याने सांगितले, मिलापने मला सांगितले होते की माझे पात्र आजच्या पिढीतील सशक्त आणि सक्षम महिलेचे आहे. तिच्यापुढे आदर्श आहेत. समतोल जीवन आहे. त्यामुळेच मी स्मृति इराणी यांच्यापासून प्रेरणा घेतली.
महिलांनी राजकारणी महिलेची भूमिका साकारण्याचे प्रमाण खूपच कमी आहेत. आंधीमध्ये सुचित्रा सेन, मॅडम चीफ मिनिस्टरमध्ये रिचा चड्डा, थलायवीमध्ये कंगना राणौत यांनी राजकारण्यांच्या भूमिका केल्या आहेत. यामध्ये आता दिव्या खोसलाचा नाव आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App