जायंट किलर स्मृति इराणींवर पश्चिम बंगालची जबाबदारी, ममता बॅनर्जी यांना देणार आव्हान


अमेठीमध्ये राहूल गांधी यांना पराभूत करून जायंट किलर बनलेल्या आक्रमक नेत्या आणि केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांच्यावर पश्चिम बंगालची जबाबदारी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्या आव्हान देणार आहेत.Giant killer Smriti Irani will be incharge of West Bengal to challenge Mamata Banerjee


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : अमेठीमध्ये राहूल गांधी यांना पराभूत करून जायंट किलर बनलेल्या आक्रमक नेत्या आणि केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांच्यावर पश्चिम बंगालची जबाबदारी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्या आव्हान देणार आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या परंपरेनुसार निवडणुकीनंतर राज्याचा प्रभारी बदलला जातो. त्याप्रमाणे कैलास विजयवर्गीय यांनापश्चिम बंगालच्या प्रभारीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येणार आहे.



विशेष म्हणजे कैलास विजयवर्गीय यांनी आत्तापर्यंतचे कोणत्याही राज्याचे दीर्घकाळ प्रभारी राहिलेले एकमेव आहेत. पश्चिम बंगालचे ते २०१४ पासून सलग सहा वर्षे प्रभारी होते.

भाजपामध्ये केवळ निवडणुकीच्या काळात केंद्रीय मंत्र्यांना प्रभारी बनविले जाते. निवडणुकांनंतर पूर्ण वेळ प्रभारी बनविले जात नाही. मात्र, पश्चिम बंगालबाबत अपवाद केला जाणार आहे. अ

मेठीमध्ये पहिल्यांदा पराभूत होऊनही उमेद न खचून देता स्मृति इराणी काम करत राहिल्या. त्यामुळे अशक्यप्राय ते साध्य करून राहूल गांधी यांचा त्यांच्या बालेकिल्यात पराभव करून त्या जायंट किलर बनल्या. आक्रमक आणि लढाऊ नेत्या अशी त्यांची प्रतिमा आहे.

स्मृति इराणी या टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. तरीही पक्षातील अगदी तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क आहे. एखादे उद्दिष्ठ ठेऊन काम करण्याची त्यांची क्षमता आहे.

महिला मोर्चातून कामास सुरूवात करून त्या केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहोचल्या. मात्र, अजूनही त्यांचा अगदी सामान्य कार्यकर्त्यांशीही संपर्क आहे. चांगल्या टीम लीडर म्हणून त्या ओळखल्या जातात.

ममता बॅनर्जी यांच्यासारख्या महिला नेत्याबरोबर पश्चिम बंगालमध्ये भाजपाची लढाई आहे. ममतांना तळागाळातील राजकारण माहिती आहे. त्यामुळे ममतांना आव्हान देणे सोपे नाही. निवडणुकीनंतर त्यांची प्रतिमा आणखी उजळून निघाली आहे.

त्यामुळेच गेल्या निवडणुकीचा धडा घेऊन ममतांच्या विरोधात स्मृति इराणी यांना उभे केले जाणार आहे.पश्चिम बंगालमध्ये २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत २.३ कोटी मते मिळाली होती. तरीही त्याचे जागांमध्ये रुपांतर झाले नाही.

याचे कारण म्हणजे मतपेटीचे स्वरुप बदलले. आणखी एक मुख्य कारण म्हणजे ममतांना महिला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाला. कन्याश्री, रुपाश्री यासारख्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळाला.

त्यामुळे त्यांनी महिलांच्या मनात स्थान बनविले आहे. स्मृति इराणी या महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून काम करत आहे. त्यामुळे या मतदारांना त्या आकर्षित करून घेऊ शकतात.

स्मृति इराणी बंगाली भाषा अस्खलितपणे बोलू शकतात. सोनार बांगलासारख्या त्यांच्या घोषणा आणि बंगालीमध्ये केलेली भाषणे चांगलीच व्हायरल झाली होती. त्यामुळे भाजपाला पश्चिम बंगालमध्ये बंगाली चांगली बोलू शकणाऱ्या नेत्याची गरज आहे.

Giant killer Smriti Irani will be incharge of West Bengal to challenge Mamata Banerjee

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात