मध्य प्रदेशात जबरदस्त विजय मिळवून शिवराज मामांचे दिमाखात विदाईचे संकेत!!; मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नव्हतो आणि नाही!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजप सध्या अपबीट मूडमध्ये आहे. या तीनही राज्यांमध्ये मुख्यमंत्री ठरवण्याची प्रक्रिया पक्षात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात भाजपला जबरदस्त विजय मिळवून देऊन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान अर्थात मामाजी यांनी उघडपणे विदाईचे संकेत दिले आहेत मध्यप्रदेशातील जनतेला संबोधित करताना त्यांनी हे संकेत दिले. Dimakha farewell signal for Shivraj Mama after a resounding victory in Madhya Pradesh

मध्य प्रदेशातल्या जनतेची मी निरलसपणे सेवा केली. जनतेने मला आशीर्वाद दिला, पण मी यापूर्वी देखील मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नव्हतो आणि यापुढे देखील असणार नाही. माझा पक्ष भारतीय जनता पार्टी जी जबाबदारी मला देईल, ती मी पूर्ण समर्पण भावाने निभावेन, असे स्पष्ट वक्तव्य शिवराज सिंह चौहान यांनी केले. यातून त्यांनी मध्य प्रदेशातून आपल्या विदाईचेच संकेत दिल्याचे मानण्यात येत आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये कोणत्याही नेत्याला भाजपने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढे करून निवडणूक लढवलेली नव्हती. शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशात विद्यमान मुख्यमंत्री म्हणून प्रचारात आघाडीवर होते. त्यांनी 160 सभांना संबोधित केले होते. त्यामुळे राज्यात भाजपला 2/3 बहुमत मिळाले, तरी देखील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या संकेतानुसार त्यांनी स्वतःहून मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदावरून बाजूलाच होण्याचे संकेत दिले. ते गेली 20 वर्षे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले.

त्यांनीच सुरू केलेल्या लाडली बहना योजनेतून राज्यातल्या करोडो महिला लाभान्वित झाल्या आणि त्याचाच परिणाम महिलांनी भाजपला विजयी करून दाखविला, असे मानण्यात येत आहे. परंतु विजयाच्या या शिखरावर असताना स्वतः मुख्यमंत्रीपदावरून बाजूला होण्याचे संकेत शिवराज मामांनी दिल्यामुळे भाजपच्या राजकीय वर्तुळात त्यांचे स्थान उंचावल्याचे मानण्यात येत आहे. त्यांना लवकरच केंद्रीय पातळीवरची महत्त्वाची जबाबदारी देण्याचेही संकेत मिळत आहेत.

वसुंधरा राजे यांचे शक्तिप्रदर्शन

दरम्यान राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी अद्याप मुख्यमंत्री पदाची आस सोडलेली नाही. त्यांनी भाजप श्रेष्ठींसमोर आपले शक्तिप्रदर्शन सुरू ठेवल्याचे मानण्यात येत आहे. राजस्थानात भाजपने बहुमत मिळवल्यानंतर 47 आमदारांनी वसुंधरा राजे यांची भेट घेतली, त्यापैकी 3 आमदारांनी उघडपणे वसुंधरा राजे यांची बाजू घेऊन त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा असल्याचे जाहीर केले, पण भाजपने अद्याप तसे कुठलेही संकेत दिलेले नाहीत.

या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात मात्र दोन तृतीयांश बहुमत मिळवल्यानंतर देखील मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्वतःहून मुख्यमंत्री पदावरून दिमाखात पायउतार होण्याचे संकेत दिल्याने भाजपच्या अंतर्गत वर्तुळात त्यांचे राजकीय महत्त्व वाढल्याचे मानण्यात येत आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री पदाची स्पर्धा खऱ्या अर्थाने खुली झाल्याचे दिसत आहे.

Dimakha farewell signal for Shivraj Mama after a resounding victory in Madhya Pradesh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात