फडणवीसांचा राजस्थानात तुफानी दौरा; महाराष्ट्र विरोधकांना जडला पोटदुखीचा फेरा!!

नाशिक : राजस्थानात फडणवीसांचा तुफानी दौरा, पण महाराष्ट्रात विरोधकांना जडला पोटदुखीचा फेरा!! अशी अवस्था खरंच आली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या तीन दिवसांमध्ये राजस्थान परिवर्तन यात्रेमध्ये आहेत, पण त्यामुळेच महाराष्ट्रात विरोधी पक्षांच्या काही नेत्यांना पोटदुखी जडली. या पोटदुखीतून त्यांनी फडणवीसांवर शरसंधान साधले.

देवेंद्र फडणवीस राजस्थानात जयपूर, पुष्कर, नसीराबाद, केकडी, किशनगड आदी शहरांमध्ये गेले. तेथे त्यांच्या परिवर्तन यात्रा सभांना तुफान प्रतिसाद मिळाला. या सभांची तयारी राजस्थान प्रदेश भाजपने जोरदार केली होती. फडणवीसांच्या समवेत राजस्थान भाजप सहप्रभारी विजया रहाटकरही होत्या. राजस्थान दौऱ्याच्या दरम्यान राजधानी नवी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. त्या बैठकीत देवेंद्र फडणवीस सदस्य म्हणून हजर होते, पण फडणवीस यांच्या या दौऱ्यावर महाराष्ट्रातल्या विरोधकांना मात्र पोटदुखी जडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्या राजस्थान दौऱ्यावर टीका केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात रण पेटले असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री भाजपचा प्रचार करण्यामध्ये महाराष्ट्र बाहेर रमले, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. देवेंद्र फडणवीस हे अपयशी गृहमंत्री आहेत, हे ठसविण्याचा त्यांचा नियमित प्रयत्नांचा तो एक भाग होता.

 

 

 

पण त्या पलीकडे जाऊन फडणवीस यांचे महाराष्ट्र बाहेरचे दौरे आणि सुप्रिया सुळे यांची टीका याचा नेमकेपणाने अभ्यास केला, तर काही ठळक बाबी समोर येतात.

त्यामध्ये फडणवीसांसारखा तरुण नेते महाराष्ट्राबाहेर बिहार, गोवा, राजस्थान, तेलंगण यासारख्या राज्यांमध्ये जाऊन प्रचार करतात. त्यांच्या सर्वांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि आपण किंवा आपल्या राष्ट्रवादीचे बडे नेते महाराष्ट्राबाहेर कुठेही मूळात जात नाहीत. गेले तर प्रतिसाद मिळत नाही. प्रतिसाद मिळाला, तर त्याचे रूपांतर मतांमध्ये होण्याची सुताराम शक्यता नाही, अशी अवस्था असल्याने ती पोटदुखी उफाळून वर आल्याचे दिसते.

वास्तविक सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवर ते महाराष्ट्र बाहेर गेल्याची टीका आज केली. पण कालच सुप्रिया सुळे या कशा प्रभावहीन नेत्या आहेत, याचे वर्णन करताना अजितनिष्ठ राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्यांचे वाभाडे काढले. सुप्रिया सुळे वर्षभरातले किमान 180 दिवस दिल्लीत असतात. त्या सर्वोत्कृष्ट संसदपटू पारितोषिक प्राप्त खासदार आहेत. पण त्यांना आत्तापर्यंत दिल्लीत एकही साधा नगरसेवकही निवडून आणता आला नाही, असे उमेश पाटील कालच बोलून गेले. एकेकाळी अखंड राष्ट्रवादीत असलेले उमेश पाटील यांच्यासारखे नेते सुप्रिया सुळे यांना त्यांच्या कर्तृत्वाचा लख्ख आरसा दाखवतात आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांसारखे महाराष्ट्राचे पाच वर्षे मुख्यमंत्रीपद यशस्वीपणे सांभाळलेले विद्यमान उपमुख्यमंत्री राजस्थानात जाऊन यशस्वी प्रचार करतात यातली विसंगती ठळक दिसते.

याखेरीज आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे राष्ट्रवादीने 2019 नंतर झालेल्या उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, पश्चिम बंगाल वगैरे राज्यांमध्ये काही मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले. त्यावेळी राष्ट्रवादी अखंड होती. पण राष्ट्रवादीच्या बाबतीत अन्य राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य असे, की राष्ट्रवादी त्या – त्या राज्यांमध्ये जेवढ्या संख्येने उमेदवार उभे करी, त्यापेक्षा अधिक संख्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची असे. म्हणजे राष्ट्रवादी प्रत्येक राज्यात किमान 40 स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे देत असे. पण यापैकी किती स्टार प्रचारकांनी प्रत्यक्षात त्या त्या राज्यांमध्ये जाऊन सभा घेतल्या, त्या सभांना कुठे आणि कसा प्रतिसाद मिळाला??, याच्या मराठी माध्यमांमध्ये कधीही बातम्या आल्या नाहीत, मग इंग्रजी अथवा हिंदी राष्ट्रीय माध्यमांनी राष्ट्रवादीच्या सभांची दखल घेणे तर सोडूनच द्या!!

या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा भाजपचा नेता महाराष्ट्र सोडून बाहेरच्या राज्यात जातो, तिथले निवडणूक प्रभारी पद सांभाळतो, ही खरी सुप्रिया सुळे आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची पोटदुखी आहे.

आता कोणाला पोटदुखी होते म्हणून फडणवीसांसारखा नेता असा कुठे थांबत नसतो. पक्षाने दिलेले काम आणि दिलेली असाइनमेंट पूर्ण करणे, त्याचे राजकीय महत्त्व त्यांच्यासारख्या नेत्याला समजते आणि त्यानुसारच ते त्यांचे राजकीय आचरण ठेवतात. राजस्थानातल्या परिवर्तन यात्रेतल्या सहभागातून फडणवीसांनी हे दाखवून दिले आहे. मग विरोधकांना पोटदुखी होवो अथवा त्या पुढचा कोणता विकार होवो, त्याने फडणवीसांसारख्या नेत्याला फरक पडत नाही. फडणवीस आपले काम करत राहतात. कारण हे त्यांच्या पक्ष परिवाराचे संस्कार आहेत.

 

Devendra fadnavis on whirlwind tour of rajasthan, but supriya sule upset over his political performance

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात