विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण आंदाेलन सुरू झाल्यापासून मनाेज जरांगे पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. मुख्यमंत्री किंवा दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर काही बाेलत नाहीत, पण फडणवीस यांच्यावर सातत्याने आराेप करतात. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांना थेट आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचे आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना थांबवले, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले.
‘मला याची कल्पना आहे की जरांगे पाटलांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. मात्र, राज्याचे सर्व अधिकारी हे मुख्यमंत्र्याकडे असतात. मी तर त्याच्यापुढे जाऊन म्हणणे की जरांगे पाटील जे म्हणत आहे त्या विषयी थेट एकनाथ शिंदे साहेब यांना विचारावे. मी एकनाथ शिंदे साहेबांना थांबवले हे सिद्ध झाले तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल.
फक्त राजीनामाच नाही तर राजकीय संन्यास घेईल. मराठा समाजासाठी जे निर्णय झाले ते मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी घेतले मी त्यांच्यामागे भक्कमपणे उभा राहिलो. मी शिंदे साहेबांना अडथळा निर्माण करत असल्याचा चुकीचा नेरेटिव्ह सेट केला जातो आहे. मात्र मी शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये विरोधकांनी अडथळे निर्माण केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे योजना आता आपल्याकडे खेचण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांनी त्यांची सत्ता असताना ही योजना का नाही आणली.
बहिणींना सगळे माहित आहे. त्या महायुतीच्या मागे भक्कमपणे उभ्या राहतील, जरांगे पाटील गेल्या दीड ते दाेन वर्षांपासून सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत आहेत. मात्र, फडणवीस यांनी त्यांना उत्तर देणे टाळले हाेते. मात्र, आता जरांगे पाटील यांनी थेट आराेप केला असल्याने फडणवीस यांनी त्यांना चाेख उत्तर दिले आहे. जरांगे पाटील यावर काय म्हणतात याकडे लक्ष लागले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App