Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांवर घणाघात, त्यांच्यावर 100 कोटी वसुलीचे आरोप; बदलीसाठी 40 लाख रुपये घ्यायचे

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काटोलमध्ये चांदिवाल आयोगावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सडकून टीका केली. चांदिवाल आयोगानुसार अनिल देशमुखांवर गंभीर आरोप असल्याचे फडणवीस म्हणाले. एका गृहमंत्र्यावर 100 कोटी वसुलीचे आरोप असल्याची टीका त्यांनी केली. बदलीसाठी तत्कालीन गृहमंत्री 40 लाखांची लाच घेत होते, असेही ते म्हणाले.

नागपुरातील एका गृहमंत्र्यावर 100 कोटी घेतल्याचे आरोप होतात, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता अनिल देशमुख यांच्यावर केली आहे. आम्हाला 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगतात असा आरोप त्यांचेच पोलिस आयुक्त आणि एक एसीपी यांनी लावला होता. उच्च न्यायालयाने त्या प्रकरणार चौकशी करण्याचे आदेश दिले. ते प्रकरण सीबीआयला देत गंभीर ताशेरे ओढले. हे प्रकरण अतिशय गंभीर असून या प्रकरणामध्ये अत्यंत भयानक असे पुरावे आहेत. पण तब्येतीच्या आधारावर आता आम्ही त्यांना बेल देतो आहे, असे न्यायालय म्हणाले होते, असे फडणवीसांनी सांगितले.


sharad pawar and ajit pawar काका – पुतण्यांची निवडणुकीच्या ऐन मध्यात जुंपली; अदानींना घेतले मधी!!


बदलीसाठी 40 लाख रुपये घेतल्याचा पुरावा

आज ते जे काही गेले वर्षभर या ठिकाणी खोटं बोलत होते, त्याची पोल उघडलेली आहे. पण केवळ त्यांचीच पोल उघडलेली नाही, तर ज्यांना उमेदवार म्हणून त्यांनी उभे केले त्या सलील बाबू बद्दल देखील आज जस्टीस चांदीवार यांनी सांगितले की, त्या ठिकाणी 40 लाख रुपये बदलीचे घेतल्याचा पुरावा वाझे देत होता. पण माझ्या कार्य कक्षेबाहेर असल्यामुळे मला तो पुरावा रेकॉर्डवर घेता आला नाही, असेही फडणवीसांनी सांगितले.

तुमचे आमदार मंत्रालयात कधी दिसले नाही

20 25 वर्ष तुम्हीच मंत्री तुम्हीच या ठिकाणी सातत्याने निवडून येणार. निवडणूक आली की, भावनिक होणार, जातीपातीचे राजकारण करणार, हम साथ साथ है म्हणणार आणि निवडणूक झाल्यावर हम आपके हे कोण असे 25 वर्षापासून सुरू आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. आठवड्यातील दोन दिवस आमदाराने मंत्रालयात गेले तरच काम होतात, पण तुमचे आमदार मंत्रालयात कधी दिसले नाही, असा टोलाही फडवणीसांनी केला. चरण सिंग ठाकूर मात्र मंत्रालयात घाटोल मधील प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा करताना दिसत होते, असेही फडणवीसांनी नमूद केले. तुम्ही पुढाकार घ्या आपले सरकार आल्यानंतर सूतगिरणी देण्याचा वचन हा देवाभाऊ तुम्हाला देतो, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना दिले.

Devendra Fadnavis attacks Anil Deshmukh, accuses him of extorting Rs 100 crore

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात