विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार??, यावर महाविकास आघाडीत वाद रंगला असताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करायचे आव्हान दिले. त्यांनी शरद पवारांच्या पक्षातली जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या दोघांची नावे घेतली, पण पवारांच्या मनातले नाव घेणे टाळले. यावरून महाविकास आघाडीत सगळं काही सध्या अलबेल नाही आणि मतमोजणी नंतरही अलबेल राहण्याची शक्यता नाही, याची चुणूक दिसली.
महाविकास आघाडी किंवा महायुती कुणीही मुख्यमंत्री जाहीर केलेला नाही. त्यामुळं निवडणुकीनंतर राज्यात कुणाचं सरकार कुणाचं येणार आणि कोण मुख्यमंत्री होणार??, याबाबत अनेकजण तर्क-वितर्क लढवत आहेत. पण उद्धव ठाकरे यांनी माझ्या मनात मुख्यमंत्री व्हायचं अजिबात नाही, असं म्हणत मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवारांच्या दोन नेत्यांची नाव घेत त्यांना पाठिंबा दिला. पण त्यांनी सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले नाही.
उद्धव ठाकरेंनी मुंबई तकला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
sharad pawar and ajit pawar काका – पुतण्यांची निवडणुकीच्या ऐन मध्यात जुंपली; अदानींना घेतले मधी!!
– उद्धव ठाकरे म्हणाले :
– शरद पवारांच्या जर जास्त जागा आल्या तर त्यांच्या मनात जर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड किंवा आणखी कुणाचं नाव असेल तर त्यांनी जाहीर करावं. काँग्रेसने जाहीर करावं, मी जाहीर पाठिंबा देईन. मला फक्त सत्तेत महाराष्ट्राचे लुटारू नकोत, त्यांनी माझ्या पाठीत वार केला, याचा मला राग आहे. पण याचा अर्थ मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असा नाही.
– मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा असणं किंवा नसण्यापेक्षा जनतेची इच्छा महत्त्वाची आहे. शिवसेनाप्रमुखांच्या मुलाशी यांनी गद्दारी केली. शिवसेना प्रमुखांमुळेच यांची आज पंचतारांकित शेती आहे. ही कुणाच्या जोरावर झाली?? तुम्ही आयुष्यात काय करू शकला असता?? तुम्हाला ज्यांनी संगळं दिलं, त्यांनाच भाजपने फसवलं म्हणून मी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं होतं. आधी पाच वर्ष आम्ही जेव्हा भाजपसोबत होतो, तेव्हा याच टिकोजीरावांनी भर सभेत भाजप नको म्हणून राजीनामा दिला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App