Kolkata rape : मृत्यूपूर्वी पीडितेला दिल्या जखमा, बलात्काराची पुष्टी, पण फ्रॅक्चर नाही; कोलकाता घटनेचा तपशीलवार पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर

Kolkata rape

वृत्तसंस्था

कोलकाता : कोलकाता ( Kolkata  ) येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये 9 ऑगस्ट 2024 रोजी एक पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर मृतावस्थेत आढळली होती. बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी सविस्तर पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. ज्यात पीडितेवर झालेले क्रौर्य उघड झाले आहे. पीएम रिपोर्टनुसार मृताच्या शरीरावर 14 हून अधिक जखमांच्या खुणा होत्या.

डोके, दोन्ही गाल, ओठ (वरचा आणि आतील), नाक, उजवा जबडा, हनुवटी, मान (एपिग्लॉटिसच्या जवळ आणि वर), डावा हात, खांदा, गुडघा, घोटा आणि प्रायव्हेट पार्टवर जखमा आढळल्या. शरीराच्या अनेक भागांमध्ये रक्ताच्या गुठळ्यांसह फुफ्फुसात रक्तस्त्राव झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. व्हिसेरा, रक्त आणि इतर गोळा केलेले नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.



पीएम रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की पीडितेच्या शरीरावर आणि प्रायव्हेट पार्टवरील सर्व जखमा तिच्या मृत्यूपूर्वी झाल्या आहेत. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे, दोन्ही हातांनी गळा दाबल्याने पीडितेचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फोर्सफुल पेनिट्रेशनचे वैद्यकीय पुरावे सापडले आहेत. पीएम रिपोर्टमध्ये महिला डॉक्टरचा लैंगिक छळ झाल्याचा उल्लेख आहे.

कोलकाता घटनेची सुप्रीम कोर्टाने स्वतःहून घेतली दखल

कोलकाता घटनेची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे. 20 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी, पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मंगळवारी होणाऱ्या सुनावणीच्या यादीत हे प्रकरण 66 व्या क्रमांकावर असले तरी खंडपीठ प्राधान्याने त्यावर सुनावणी करेल, असा विशेष उल्लेख आहे. देशव्यापी संताप आणि डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर 17 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात या विषयावर याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या क्रौर्याची स्वत:हून दखल घेण्याची विनंती करण्यात आली.

detailed postmortem report of the Kolkata rape victim is out

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात